Ground X
क्रीडा

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Pakistani Team India: पाकिस्तानचा हॉकी संघ आशियाई करंडक व ज्युनियर हॉकी विश्‍वकरंडकात सहभागी होण्यासाठी भारतात येणार आहे. पाकिस्तानला या स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखल्यास ऑलिंपिक कायद्याचे उल्लंघन होईल.

Sameer Panditrao

New Delhi News: पाकिस्तानचा हॉकी संघ आशियाई करंडक व ज्युनियर हॉकी विश्‍वकरंडकात सहभागी होण्यासाठी भारतात येणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांकडून याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले की, आशियाई करंडक व ज्युनियर विश्‍वकरंडक यामध्ये सहभागी होण्यापासून पाकिस्तानला आम्ही रोखू शकत नाही. पाकिस्तानला या स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखल्यास ऑलिंपिक कायद्याचे उल्लंघन होईल.

सूत्रांकडून पुढे स्पष्ट करण्यात आले की, भारतात एखादी दोन पेक्षा जास्त संघाचा सहभाग असलेली स्पर्धा आयोजित करण्यात आल्यास त्यामध्ये सहभागी होण्यापासून कोणत्याही संघाला रोखू शकत नाही. ऑलिंपिक नियमाचे उल्लंघन केल्याचा ठपका आपल्या देशावर पडेल. द्विपक्षीय मालिकेला मात्र आमचा विरोध कायम असणार आहे.

आशियाई हॉकी करंडकाचे आयोजन बिहार येथील राजगिर येथे होणार आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत रंगणार आहे. तसेच ज्युनियर हॉकी विश्‍वकरंडक चेन्नई, मदुराई येथे २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर यादरम्यान पार पडणार आहे.

या वेळी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांकडून पुढे सांगण्यात आले की, येत्या सप्टेंबर महिन्यात ज्युनियर नेमबाजी विश्‍वकरंडकाचे आयोजनही भारतात होणार आहे. तसेच जागतिक पॅरा ॲथलीट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजनही करण्यात येणार आहे. या दोन्ही स्पर्धांमध्येही पाकिस्तानच्या खेळाडूंना हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT