Goa Hockey: राज्यस्तरीय १५ वर्षांखालील हॉकी स्पर्धेत सेंट अँथनी हायस्कूल विजेते! राष्ट्रीय स्पर्धेत करणार गोव्याचे प्रतिनिधित्व

St Anthony School Monte de Guirim: नवी दिल्ली येथील शिवाजी स्टेडियमवर होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत माँत द गिरी येथील संघ खेळेल
St Anthony School Monte de Guirim: नवी दिल्ली येथील शिवाजी स्टेडियमवर होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत माँत द गिरी येथील संघ खेळेल
St Anthony School Monte de Guirim Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: माँत द गिरी येथील सेंट अँथनी हायस्कूलने राज्यस्तरीय १५ वर्षांखालील मुलांची जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धा जिंकून राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्रता मिळविली.

राज्य क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अंतिम लढतीत मंगळवारी झाली. त्यावेळी सेंट अँथनी हायस्कूलने पिलारच्या फादर आग्नेल हायस्कूलला ३-२ फरकाने हरविले. चुरशीचा ठरलेला सामना पेडे येथील हॉकी स्टेडियमवर झाला. येत्या चार ऑक्टोबरपासून नवी दिल्ली येथील शिवाजी स्टेडियमवर होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत माँत द गिरी येथील संघ खेळेल.

St Anthony School Monte de Guirim: नवी दिल्ली येथील शिवाजी स्टेडियमवर होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत माँत द गिरी येथील संघ खेळेल
Indian Men's Hockey Team: टीम इंडियाची उपांत्य फेरीत 'धडक'; ब्रिटन चारली धूळ

अंतिम लढतीत सेंट अँथनी हायस्कूलसाठी मोहन, सूरज व नाशोन यांनी गोल केले, तर फादर आग्नेल हायस्कूलसाठी एदिमचुबे व बिशाल यांनी गोल नोंदविले. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत म्हापशाच्या जनता हायस्कूलने गुडी-पारोडा येथील श्री दामोदर हायस्कूलला २-१ फरकाने नमविले. विजयी संघाचे दोन्ही गोल ज्योतिबा याने, तर पराभूत संघासाठी रद्दाश याने गोल केला.

बक्षीस वितरण सोहळा उत्तर विभागीय क्रीडा अधिकारी देवराज तारी, रेदेंत डिसोझा, एलिटर फर्नांडिस, व्हिक्टर आल्बुकर्क, लुईनो मिनेझिस, प्रीतम मंगळूरकर, अय्याझ खान यांच्या उपस्थितीत झाले. खात्याचे राज्य क्रीडा आयोजक अनंत सावळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com