Saim Ayub Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: 9 वर्षांच्या चिमुरड्यानं पाकिस्तानी स्टारची काढली हवा, क्लीन बोल्डचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोलिंग

Saim Ayub Clean Bold 9 Year Old Boy: पाकिस्तान क्रिकेट संघाचा युवा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम अयुब सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

Manish Jadhav

Saim Ayub Viral Video: पाकिस्तान क्रिकेट संघाचा युवा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम अयुब सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून यामध्ये तो एका अवघ्या 9 वर्षांच्या मुलाच्या चेंडूवर क्लीन बोल्ड होताना दिसत आहे. 23 वर्षांचा सॅम अयुब हा त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखला जातो, मात्र गेल्या काही काळापासून त्याची बॅट शांत आहे. टी-20 विश्वचषकानंतर पाकिस्तान सुपर लीगमध्येही त्याला विशेष चमक दाखवता आली नाही. अशातच हा व्हिडिओ समोर आल्याने क्रिकेट जगतात त्याची मोठी चर्चा होत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सॅम अयुब काही लहान मुलांसोबत सराव करताना दिसत आहे. गोलंदाजी करण्यासाठी अनेक मुले रांगेत उभी होती. यावेळी एका 9 वर्षांच्या मुलाने टाकलेला चेंडू अयुबने अडवण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूचा वेग आणि वळण त्याला समजू शकले नाही आणि तो थेट क्लीन बोल्ड झाला. चेंडू नेमका कसा आला, याचा त्याला अजिबात पत्ता लागला नाही. विशेष म्हणजे, बाद झाल्यानंतर अयुबने राग न व्यक्त करता त्या मुलाचे मनापासून कौतुक केले आणि टाळ्या वाजवून त्याला दाद दिली. जरी त्याने खिलाडूवृत्ती दाखवली असली, तरी त्याच्या खराब फॉर्ममुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

सॅम अयुब सध्या त्याच्या कारकिर्दीतील अत्यंत खराब टप्प्यातून जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये हैदराबाद किंग्समॅनकडून खेळताना त्याने 13 सामन्यांत केवळ 258 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 21 आणि स्ट्राईक रेट 119 इतका कमी राहिला. विशेष म्हणजे, फ्रँचायझीने त्याला 12.6 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते, परंतु त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. त्याने पाकिस्तानसाठी कसोटी, वनडे आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आतापर्यंत 8 कसोटी, 17 वनडे आणि 67 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी आणि टी-20 मध्ये त्याची कामगिरी निराशाजनक राहिली असली, तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 46.93 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

या व्हायरल व्हिडिओमुळे त्याच्या तंत्रावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या फलंदाजाला एका 9 वर्षांच्या मुलाने अशा प्रकारे बाद करणे, हे त्याच्या सध्याच्या मानसिक स्थितीचे आणि खराब फॉर्मचे प्रतीक असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. आगामी मालिकांमध्ये सॅम अयुब स्वतःला सिद्ध करुन संघात आपले स्थान टिकवून ठेवणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तुर्तास, या छोट्या गोलंदाजाच्या कौशल्याने आणि सॅम अयुबच्या या 'अजीब' विकेटने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mango Price: आंबा पुन्‍हा 'भाव' खाऊ लागला! आवक घटली, मानकुराद 800 तर मांगेलाल 500 रुपये डझन

Konkan Railway: कोकण रेल्वे प्रशासनाचा अ‍ॅक्शन मोड! कुजलेली फळे विकणाऱ्यांवर कडक कारवाई

Vaibhav Sooryavanshi: सामना लॉर्ड्सवर, पण चर्चा भारताच्या वैभवची! युवा खेळाडूच्या धडाकेबाज कामगिरीची होतेय चर्चा Watch Video

Goa Lake Pollution: गोव्याची जलसंपदा वाचेल का?

Ebola Virus Case: राजस्थानमध्ये आढळला इबोलाचा पहिला संशयित रुग्ण; युगांडाच्या महिला पर्यटकामुळे आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर

SCROLL FOR NEXT