Pakistan Cricket Board Dainik Gomantak
क्रीडा

Pakistan Cricket Baord: पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठा बदल; पीसीबीची कमान पंतप्रधानांच्या हाती

Pakistan Cricket: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये टॉप 4 मधून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळाले.

Manish Jadhav

Pakistan Cricket Baord: पाकिस्तान क्रिकेट संघाची अवस्था सध्या खूपच वाईट आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये टॉप 4 मधून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळाले. पहिल्यांदा बाबर आझमकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले आणि त्यानंतर कोचिंग स्टाफमध्येही मोठे फेरबदल करण्यात आले. आता पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदल पाहायला मिळत आहे. खरे तर, पीसीबी आता थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या अखत्यारीत आले आहे. यानंतर पीसीबी सर्व अहवाल पंतप्रधानांना सादर करेल.

पंतप्रधान मंडळ चालवतील

पाकिस्तान क्रिकेटचा विचार करता हे मोठे पाऊल मानले जात आहे. या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवे बदल पाहायला मिळू शकतात. वास्तविक, पूर्वी पीसीबी आयपीसीच्या कक्षेत कार्यरत होते आणि ते प्रांतीय समन्वय मंत्रालयाद्वारे नियंत्रित होते, परंतु आता ते थेट पंतप्रधान कार्यालयातून (पीएमओ) चालवले जाईल.

वास्तविक, हे पाऊल उचलण्याचे मुख्य कारण म्हणजे पाकिस्तान क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेणे. जेणेकरुन पाकिस्तान क्रिकेटमधील कामगिरीकडे अधिक लक्ष देता येईल. मात्र, क्रिकेटची कमान थेट पीएमओच्या हाती सोपवल्यानंतर भविष्यात पाकिस्तान क्रिकेटमध्ये नक्कीच मोठे बदल पाहायला मिळतील, अशी अपेक्षा आहे.

पाकिस्तान क्रिकेटची अवस्था वाईट आहे

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयानंतर इथून आता पाकिस्तान क्रिकेटमध्ये प्रगती दिसून येते की नाही, हे पाहायचे आहे. खरे तर, एक काळ असा होता जेव्हा पाकिस्तान क्रिकेट संघात जगातील मोठ्या संघांशी स्पर्धा करण्याची ताकद होती. आता एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील खराब कामगिरीनंतर प्रथम बाबर आझमला कर्णधारपदावरुन हटवण्यात आले. कोचिंग स्टाफमध्येही अनेक मोठे बदल दिसून आले. यानंतरही पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून तीन कसोटी सामन्यांची मालिका 3-0 अशी गमवावी लागली होती. यानंतर टी-20 संघाचा नवा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने टी-20 मालिका 4-1 अशी जिंकली. त्यानंतर या टीमवर अनेक मोठे प्रश्न उपस्थित होऊ लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT