Pakistan Cricket Board: पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदल; सय्यद मोहसिन रझा नक्वी बनले PCB चेअरमन

PCB New Chairman Syed Mohsin Raza Naqvi: आता सय्यद मोहसिन रझा नक्वी यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
Pakistan Cricket Board New Chairman
Pakistan Cricket Board New ChairmanDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Cricket Board New Chairman:

पाकिस्तान क्रिकेट बोर्डात सतत बदल होत आहेत. आता सय्यद मोहसिन रझा नक्वी यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. शाह खवर यांनी आज लाहोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशासकीय मंडळाची विशेष बैठक बोलावली होती. ज्यामध्ये त्यांची पीसीबीचे नवे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.

दरम्यान, डिसेंबर 2022 पासून पीसीबी कायमस्वरुपी प्रमुखाशिवाय आहे, जेव्हा माजी कर्णधार आणि तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांचे निवडलेले उमेदवार रमीझ राजा यांना मध्यरात्री सरकारी अधिसूचनेद्वारे काढून टाकण्यात आले होते. तेव्हापासून नजम सेठी आणि झका अश्रफ यांनी अंतरिम प्रमुख म्हणून काम केले होते. मोहसिन रझा नक्वी यांच्या आधी झका अरशफ हे प्रमुख होते. 19 जानेवारीला त्यांनी पद सोडले होते.

पीसीबीचे 37 वे अध्यक्ष बनले

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (Pakistan Cricket Board) प्रमुखपदी निवड झाल्यानंतर सय्यद मोहसीन रझा नक्वी म्हणाले की, ''पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्यामुळे मला खूप छान वाटत आहे. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. देशातील खेळाचा स्तर सुधारण्यासाठी आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटला पुढे नेण्यासाठी मी पूर्णपणे समर्पित आहे.''

45 वर्षीय मोहसिन रझा नक्वी हे मीडिया मुगल म्हणून ओळखले जातात. पाकिस्तानमध्ये 24 न्यूज नावाचे त्यांचे स्वतःचे चॅनल आहे. याशिवाय, सध्या ते पाकिस्तानमधील (Pakistan) पंजाब राज्याचे कार्यवाहक मुख्यमंत्री आहेत.

विश्वचषकापासून बदलाचे वारे

एकदिवसीय विश्वचषक 2023 पासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदलांचा काळ सुरु आहे. पाकिस्तानी संघ 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करु शकला नाही आणि उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही. एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर, पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले.

यानंतर कसोटीत शान मसूद आणि टी-20मध्ये शाहीन आफ्रिदीकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. टीम डायरेक्टर मिकी आर्थरलाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मोहम्मद हाफीज पाकिस्तानी संघाचा नवा संचालक झाला. तर वहाब रियाझला मुख्य सिलेक्टर्स बनवण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com