Pakistan Cricket: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा झटका, 'या' 3 दिग्गजांनी एकत्र दिला राजीनामा

Pakistan Cricket Board: एवढेच नाही तर पीसीबीमध्ये अनेक पदांवर सातत्याने बदल होत असून एकापाठोपाठ एक राजीनामे होताना दिसत आहेत.
Pakistan Cricket Board
Pakistan Cricket BoardDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Cricket Board Major Setback 3 Resignation Together: आशिया चषक 2023 नंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. त्याचवेळी, 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर संघात बदलांची मालिकाच सुरु झाली. एवढेच नाही तर पीसीबीमध्ये अनेक पदांवर सातत्याने बदल होत असून एकापाठोपाठ एक राजीनामे होताना दिसत आहेत. गुरुवारी असेच काहीसे घडले जेव्हा तीन प्रशिक्षकांनी एकत्रितपणे आपल्या पदांचा राजीनामा दिल्याची बातमी समोर आली.

तीन दिग्गजांनी एकत्र राजीनामा दिला

मात्र, या पोस्ट्स पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीशी संबंधित होत्या. मिकी आर्थर, ग्रँट ब्रॅडबर्न आणि अँड्र्यू पुटिक अशी या तीन प्रशिक्षकांची नावे आहेत. अलीकडेच, एकदिवसीय विश्वचषकानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एनसीएमध्ये नवीन कोचिंग स्टाफची नियुक्ती केली होती. 2016 ते 2019 पर्यंत पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक असलेले आर्थर यांना एप्रिल 2023 मध्ये संघाचे क्रिकेट संचालक बनवण्यात आले होते.

Pakistan Cricket Board
Pakistan Cricket: ''बाबर आझमच्या बॅटिंग ऑर्डरबाबत...''; नवा कसोटी कर्णधार शान मसूद असं का म्हणाला?

याशिवाय, ब्रॅडबर्न 2018 ते 2020 पर्यंत क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून संघासोबत होते. गेल्या वर्षी त्यांना मुख्य प्रशिक्षकही बनवण्यात आले होते. तसेच, पुटिक हे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघासोबत होते. विश्वचषकानंतर पाकिस्तानने सर्व प्रशिक्षक आणि कर्णधार बदलले होते. यानंतर तिघांनाही राष्ट्रीय संघातून काढून एनसीएमध्ये जबाबदारी देण्यात आली. तर मोहम्मद हाफीजची संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

Pakistan Cricket Board
Pakistan Cricket: पाकिस्तानी खेळाडूला 'ही' कृती पडली महागात, पीसीबीने ठोठावला मोठा दंड

मोहम्मद हाफीज मुख्य प्रशिक्षक झाला

नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत हाफिज मुख्य प्रशिक्षक होता. याशिवाय, अॅडम होलिओक यांना फलंदाजी प्रशिक्षक आणि उमर गुल आणि सईद अजमल यांना अनुक्रमे वेगवान गोलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान संघाला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. आशिया चषक आणि विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर संघाने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका 3-0 ने गमावली. त्यानंतर टीमने न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिका 3-0 ने गमावली. शान मसूदला रेड बॉलचा कर्णधार तर शाहीन आफ्रिदीला व्हाईट बॉलचा कर्णधार बनवण्यात आले असले तरी त्याचा परिणाम अद्याप संघावर दिसून आलेला नाहीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com