Babar Azam X/TheRealPCB
क्रीडा

Babar Azam: भारताविरुद्धच्या पराभवानंतर बाबरचा कसा केला पाकिस्तान टीमने वाढदिवस साजरा, पाहा Video

Pranali Kodre

Pakistan Captain Babar Azam Birthday:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शनिवारी (14 ऑक्टोबर) पाकिस्तान क्रिकेट संघाला भारताविरुद्ध पराभवाचा धक्का बसला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे मात्र, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या वाढदिवसाला काहीशी निराशेची किनार लाभली.

दरम्यान, पाकिस्तानचा संघ या सामन्यानंतर रविवारी (15 ऑक्टोबर) बंगळुरूला पुढील सामन्यासाठी पोहोचला. तिथेच बाबरचा वाढदिवस साजरा करण्यात आला. रविवारी बाबरचा 29 वा वाढदिवस होता. त्यामुळे बंगळुरूला हॉटेलमध्ये पाकिस्तान संघ पोहचल्यानंतर त्यांचे शानदार स्वागत झाले.

यानंतर तिथेच बाबरच्या वाढदिवसाचा केकही कापण्यात आला. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की हॉटेलमध्ये आल्यानंतर बाबरने टेबलवर ठेवलेला केक कापला.

यावेळी त्याच्या आजूबाजूला पाकिस्तान संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य आहेत. बाबरने केक कापल्यानंतर तो त्याने खेळाडूंना भरवला. यावेळी खेळाडू मस्तीही करताना दिसले.

पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी

बंगळुरूमध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघात २० ऑक्टोबर रोजी सामना रगंणार आहे. दरम्यान 2012 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तान बंगळुरुमध्ये सामना खेळणार आहेत.

यापूर्वी 2012 मध्ये बंगळुरूमध्ये पाकिस्तानने भारताविरुद्ध टी20 सामना खेळला होता. त्या सामन्यात पाकिस्तानने ५ विकेट्सने विजय मिळवला होता. त्याचबरोबर 1996 साली पाकिस्तानने बंगळुरूमध्ये भारताविरुद्ध वर्ल्डकप सामना खेळला होता. त्या सामन्यात भारताने 39 धावांनी विजय मिळवला होता.

भारताविरुद्ध 8 वा पराभव

पाकिस्तानने भारताविरुद्ध पराभव स्विकारण्यापूर्वी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवले होते. त्यामुळे पाकिस्तान सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहेत.

तथापि, पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये भारताला पराभूत करण्यात पुन्हा अपयश आहे. पाकिस्तानचा वनडे वर्ल्डकपमधील भारताविरुद्धचा हा आठवा पराभव होता. यापूर्वी 1992, 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 या वर्षी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धांमध्ये पाकिस्तानला भारताविरुद्ध पराभव स्विकारावा लागला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

SCROLL FOR NEXT