Pakistan Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs SL: करो या मरो सामन्यात 22 वर्षीय खेळाडू करणार वनडे पदार्पण, पाकिस्तानची प्लेइंग 11 जाहीर!

PAK vs SL Playing XI: आशिया कप 2023 मधील पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना एखाद्या सेमीफायनलसारखा आहे.

Manish Jadhav

PAK vs SL Playing XI: आशिया कप 2023 मधील पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना एखाद्या सेमीफायनलसारखा आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत भारताशी भिडणार आहे.

अशा परिस्थितीत हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो असा असणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी पाकिस्तानने आपली प्लेइंग 11 जाहीर केली आहे.

या संघात 22 वर्षीय खेळाडूचाही समावेश करण्यात आला आहे. हा खेळाडू वनडेमध्ये पदार्पण करणार आहे.

22 वर्षीय खेळाडूचे नशीब उघडले

पाकव्याप्त काश्मीरमध्ये जन्मलेला क्रिकेटपटू जमान खान (Zaman Khan) कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या करो या मरो सामन्यात पाकिस्तानसाठी वनडे पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूर येथील गरीब कुटुंबातील हा खेळाडू काश्मीर लीगमध्ये खेळल्यानंतर कॅनडा आणि श्रीलंकेच्या टी-20 लीगमध्ये खेळला आहे.

त्याने कोणतेही प्रथम श्रेणी सामने खेळलेले नाहीत, परंतु अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सहा टी-20 सामन्यांमध्ये त्याने पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.

पाकिस्तानसाठी (Pakistan) 6 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 32.50 च्या सरासरीने आणि 6.66 च्या इकॉनॉमीने 4 बळी घेतले आहेत.

नसीम शाहच्या जागी संधी मिळाली

दुखापतग्रस्त नसीम शाहच्या जागी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याचा पाकिस्तान संघात समावेश केला आहे.

त्याचवेळी, बुधवारी पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने जाहीर केलेल्या प्लेइंग 11 मध्ये वेगवान गोलंदाज हारिस रौफ दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नसल्याचे निश्चित करण्यात आले.

2021 मध्ये काश्मीर लीगमध्ये खेळताना 22 वर्षीय जमान प्रसिद्धीच्या झोतात आला आणि लाहोर कलंदरने त्याला पाकिस्तान सुपर लीगसाठी आपल्या संघात समाविष्ट केले.

तो इंग्लिश काउंटी संघ डर्बीशायरकडूनही खेळला, ज्याचे पाकिस्तान संघाचे संचालक मिकी आर्थर हे मुख्य प्रशिक्षक आहेत.

झमानने इंग्लंडमध्ये (England) नुकत्याच झालेल्या 'द हंड्रेड' स्पर्धेत मँचेस्टर इनव्हिन्सिबल्ससाठी सहा सामने खेळले आणि दोन विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानची प्लेइंग 11

मोहम्मद हारिस, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, जमान खान.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IRCTC Goa Tour Package: बजेटमध्ये गोवा टूर! आयआरसीटीसी घेऊन आलंय जबरदस्त पॅकेज; 3 रात्री 4 दिवसांच्या सैरसाठी लगेच बुकिंग करा

Montha Cyclone Latest Update: 'मोन्था' चक्रीवादळानं धारण केलं रौद्र रुप, आंध्रच्या किनाऱ्यावर धडकणार, ताशी 110 किमी वेगाने वाहणार वारे; रेड अलर्ट जारी

Goa Tourism: सुट्टीसाठी गोव्यात जाताय? बसेल हजारोंचा दंड, गाडी चालवताना 'हे' नियम हवे तोंडपाठ

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारनं दिली मंजुरी, 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Plane Crash: पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले, 12 जणांचा मृत्यू, शोध आणि बचावकार्य सुरु; अपघाताचे कारण अस्पष्ट VIDEO

SCROLL FOR NEXT