Pakistan Test Team Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs NZ: पाकिस्तानच्या टीममध्ये कॅप्टन्सीचा सावळा गोंधळ! बाबर आजारी पडला अन् मैदानात...

बाबर आझम मैदानातून बाहेर गेल्याने पाकिस्तान संघात कर्णधारपदावरून गोंधळ झाला.

Pranali Kodre

Pakistan Cricket Team: पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना कराची येथे सुरू असून या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक अनोखी गोष्ट घडली. बाबर आझमच्या अनुपस्थितीत पाकिस्तानचे नेतृत्व कोण करत आहे, यावर गोंधळ झालेला दिसला.

तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला बाबरला बरे वाटत नसल्याने तो मैदानात उतरला नव्हता. त्याच्याऐवजी राखीव खेळाडू म्हणून मोहम्मद रिझवान मैदानात आलेला. तो मैदानात आल्यानंतर बाबरच्या अनुपस्थितीत संघाचे क्षेत्ररक्षण लावतानाही दिसला.

पण, नेतृत्वातील गोंधळ तेव्हा समोर आला, जेव्हा पाकिस्तानने न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवेविरुद्ध रिव्ह्यूची मागणी केली. नौमान अली त्याच्या 12 व्या षटकात गोलंदाजी करत असताना त्याने 92 धावांवर फलंदाजी करणाऱ्या कॉनवेला पायचीत केले. पण त्याला आधी मैदानावरील पंच अलीम दार यांनी नाबाद घोषित केले होते.

मात्र, यावर पाकिस्तानने रिव्ह्यू घायचे ठरवले. त्यासाठी यष्टीरक्षक सर्फराज अहमद, रिझवान आणि नौमान अली चर्चा करतानाही दिसले, त्यानंतर सर्फराज आणि रिझवान या दोघांनाही तिसऱ्या पंचांकडे एकाचवेळी रिव्ह्यूची मागणी केली. त्यानंतर रिव्ह्यूमध्ये कॉनवे बाद असल्याचे आढळल्याने अलीम दार यांना आपला निर्णय बदलावा लागला.

मात्र, यादरम्यान नक्की पाकिस्तानचे नेतृत्व करतय कोण याबद्दल संभ्रम निर्माण झाला. अखेर पाकिस्तान संघव्यवस्थापनाला कळवण्यात आले की राखीव खेळाडू नेतृत्व करू शकत नाही, त्यामुळे सर्फराजने पुढील नेतृत्व सांभाळले.

क्रिकेटच्या नियमानुसार राखीव खेळाडूला गोलंदाजी आणि नेतृत्व करण्याची परवानगी नसते. तो फक्त पंचांच्या परवानगीने यष्टीरक्षणाची जबाबदारी घेऊ शकतो.

दरम्यान, सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 438 धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 161 धावांची खेळी केली, तर आघा सलमाननेही 103 धावांची शतकी खेळी केली. न्यूझीलंडकडून कर्णधार टिम साऊदीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर न्यूझीलंडने पहिला डाव 9 बाद 612 धावांवर घोषित केला. न्यूझीलंडकडून केन विलियम्सनने नाबाद 200 धावा केल्या. तसेच टॉम लॅथमने 113 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून अब्रार अहमदने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. दरम्यान न्यूझीलंडला पहिल्या डावात 174 धावांची मोठी आघाडी मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT