ICC Awards: वाह! टीम इंडियाच्या 3 क्रिकेटर्सला 'आयसीसी एमर्जिंग प्लेअर' पुरस्कारासाठी नामांकन

भारताच्या तीन क्रिकेटपटूंना आयसीसी एमर्जिंग प्लेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
 Arshdeep Singh
Arshdeep Singh Dainik Gomantak
Published on
Updated on

ICC Awards: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू 2022 पुरस्कारासाठी नामांकने जाहीर केली आहेत. या नामांकनामध्ये भारताच्या महिला आणि पुरुष दोन्ही संघातील मिळून ३ खेळाडूंना नामांकने जाहीर झाली आहेत. अर्शदीप सिंग, रेणूका सिंग आणि यास्तिका भाटिया या तीन भारतीय खेळाडूंना नामांकने मिळाली आहेत.

अर्शदीपसह आयसीसी सर्वोत्तम उदयोन्मुख पुरुष खेळाडू 2022 पुरस्कारासाठी दक्षिण आफ्रिकेचा मार्को यान्सिन, न्यूझीलंडचा फिन ऍलेन आणि अफगाणिस्तानचा इब्राहिम झाद्रान यांनाही नामांकने मिळाली आहेत.

तसेच आयसीसी सर्वोत्तम उदयोन्मुख महिला खेळाडू 2022 पुरस्कारासाठी रेणूका आणि यास्तिका यांच्यासह ऑस्ट्रेलियाच्या डार्सी ब्राऊन आणि इंग्लंडच्या एलिस कॅप्सी यांना नामांकने मिळाली आहेत.

अर्शदीपटी टी20 क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी

अर्शदीपने जुलै 2022 मध्येच इंग्लंडविरुद्धच्या टी20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याला लगेचच टी20 वर्ल्डकपमध्येही संधी मिळाली. त्याने आत्तापर्यंत केलेल्या कामगिरीमुळे त्याला टी20 संघात त्याचे स्थान जवळपास पक्के केले आहे. त्याने नोव्हेंबरमध्ये वनडे पदार्पणही केले आहे.

आत्तापर्यंत अर्शदीपने 21 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 33 विकेट्स घेतल्या आहेत. पण वनडेत मात्र त्याला 3 सामन्यांत खेळल्यानंतरही एकही विकेट मिळालेली नाही.

त्याच्यासाठी टी20 वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरुद्धचा सामना सर्वोत्तम राहिला. त्याने 4 षटकांत 3 विकेट्स घेतल्या. यात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या पाकिस्तानच्या प्रमुख फलंदाजांचा समावेश होता.

रेणूका सिंग आणि यास्तिका भाटीयाचे शानदार प्रदर्शन

गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या रेणूका सिंगनेही यावर्षी प्रभावी कामगिरी केली आहे. तिने आत्तापर्यंत 7 वनडे सामन्यांमध्ये 18 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 25 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 23 विकेट्स घेतल्या आहेत. झुलन गोस्वामीच्या निवृत्तीनंतर तिची कमी भरुन काढण्यासाठी रेणूकाकडे सध्या पाहिले जात आहे.

रेणूकाने राष्ट्रकुल स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधले होते. तसेच तिने आशिया चषकातही चांगली कामगिरी केलेली.

22 वर्षीय यास्तिका गेल्यावर्षापासून भारतीय संघाकडून खेळत असून तिने तिन्ही क्रिकेट प्रकारात भारताने प्रतिनिधित्व केले आहे. तिच्या संयमी फलंदाजीने तिने सर्वांची मने जिंकली आहेत. तिने यावर्षात 73.29 च्या स्ट्राईक रेटने 376 वनडे धावा केल्या आहेत. तिने वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्येही शानदार कामगिरी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com