Babar Azam And Najam Sethi  Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs NZ: 'बाबर आज मला भेटायला आला...', टीमच्या घोषणेनंतर नजम सेठींचं मोठं वक्तव्य

Manish Jadhav

PAK vs NZ: पाकिस्तानने मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला. यामध्ये बाबर आझम, मोहम्मद रिझवान, फखर जमान आणि शाहीन आफ्रिदीचे पुनरागमन झाले आहे.

या खेळाडूंना शारजाहमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. बाबरच्या जागी शादाब खानकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते.

दरम्यान, पाकिस्तानला (Pakistan) या मालिकेत पहिल्यांदाच 2-1 ने पराभवाला सामोरे जावे लागले होते. बाबरला कर्णधारपदावरुन हटवले जाऊ शकते, असेही बोलले जात होते.

तर शादाबच्या जागी नवीन उपकर्णधाराचीही मागणी केली जात होती. मात्र, या अटकळांना पूर्णविराम देत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष नजम सेठी यांनी मोठे विधान केले आहे.

सेठी यांनी ट्विटमध्ये लिहिले- 'बाबर आज मला भेटायला आला. मी त्याला सांगितले की, तू न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणार आहेस.' त्यानंतर पीसीबीने संघ जाहीर केला.

तीन युवा खेळाडू कायम

पाकिस्तानच्या संघात अफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan) पदार्पण करणाऱ्या इहसानुल्लाह, सैम अयुब आणि जमान खान या तीन युवा खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे. इहसानुल्लाचा कारकिर्दीत प्रथमच एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे.

पाकिस्तानचा टी-20 संघ:

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इहसानुल्ला, इमाद वसीम, मोहम्मद हरिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सईम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद आणि जमान खान

पाकिस्तानचा वनडे संघ:

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हारिस रौफ, हारिस सोहेल, इहसानुल्लाह, इमाम-उल-हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद आणि उसामा मीर. राखीव खेळाडू: अब्बास आफ्रिदी, अबरार अहमद आणि तय्यब ताहिर

वेळापत्रक

14 एप्रिल - 1ला T20 आंतरराष्ट्रीय, लाहोर

15 एप्रिल – दुसरी टी-20 आंतरराष्ट्रीय, लाहोर

17 एप्रिल - तिसरा T20 आंतरराष्ट्रीय, लाहोर

20 एप्रिल - चौथी T20I, रावळपिंडी

24 एप्रिल - 5 वा T20 आंतरराष्ट्रीय, रावळपिंडी

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

27 एप्रिल - पहिली वनडे, रावळपिंडी

29 एप्रिल - दुसरी वनडे, रावळपिंडी

3 मे – तिसरी वनडे, कराची

5 मे – चौथी वनडे, कराची

7 मे – 5 वा वनडे, कराची

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT