James Anderson Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs ENG: पाकिस्तानात जिमी अँडरसनचा जलवा, अनिल कुंबळेंना मागे टाकत...

James Anderson Record: पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात जिमीने पाकिस्तानच्या चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

दैनिक गोमन्तक

PAK vs ENG, James Anderson: इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जिमी अँडरसन सध्या शानदार प्रदर्शन करत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात जिमीने पाकिस्तानच्या चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यासोबतच जिमी अँडरसनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वास्तविक, जिमी अँडरसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.

जिमी अँडरसनने अनिल कुंबळेला मागे टाकले

जिमी अँडरसनने भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेला (Anil Kumble) मागे टाकले आहे. अनिल कुंबळेच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 956 बळी आहेत. त्याचबरोबर या यादीत श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. मुरलीच्या नावावर 495 सामन्यांत एकूण 1347 विकेट आहेत. तर यामध्ये दुसरा अनुभवी फिरकी गोलंदाज शेन वॉर्न दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 339 सामन्यात एकूण 1001 विकेट्स घेतल्या आहेत. अशाप्रकारे, सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जिमी अँडरसन हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला होता

दुसरीकडे, या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पाकिस्तानला 74 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अशाप्रकारे इंग्लंडचा संघ 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पुढे गेला आहे. पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी 342 धावांची गरज होती, पण यजमानांचा संघ 268 धावांत गुंडाळला गेला. अशा प्रकारे बेन स्टोक्सच्या संघाने हा सामना 74 धावांनी जिंकला. मात्र, तब्बल 22 वर्षांनंतर इंग्लंडने पाकिस्तानच्या (Pakistan) भूमीवर कसोटी सामना जिंकला आहे. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात सौद शकीलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 159 चेंडूत 76 धावांची खेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT