PAK vs ENG: इंग्लंडने पाकिस्तानची उडवली दाणादाण, पहिल्या कसोटीत 847 धावा करुनही...

PAK vs ENG 1st Test: इंग्लंड-पाकिस्तान कसोटी मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानातील रावळपिंडी येथे अतिशय रोमांचकारी पद्धतीने संपला.
PAK vs ENG
PAK vs ENGDainik Gomantak

PAK vs ENG 1st Test Match: इंग्लंड-पाकिस्तान कसोटी मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानातील रावळपिंडी येथे अतिशय रोमांचकारी पद्धतीने संपला. 17 वर्षांनंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळायला आला आणि तो जिंकण्यातही यशस्वी झाला. या सामन्यात पाकिस्तानचा 74 धावांनी पराभव झाला. मात्र या सामन्यात एकूण 847 धावा करुनही पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले.

पहिल्या कसोटीत इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

या सामन्यात इंग्लंडने (England) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. त्याने पहिल्या डावात 657 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात 579 धावा केल्या. त्याचवेळी इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने 7 बाद 264 धावा करुन दुसरा डाव घोषित केला. त्यामुळे पाकिस्तानला (Pakistan) 343 धावांचे लक्ष्य मिळाले. पण सामन्याच्या शेवटच्या दिवशी 268 धावा करुन ते बाद झाले. या विजयासह इंग्लंडने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

PAK vs ENG
PAK vs ENG: शानदार, जबरदस्त! दिवसभरात 4 शतके, 500 धावा; 112 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

इंग्लिश कर्णधाराने मोठा निर्णय घेतला होता

या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने डाव घोषित केला, तेव्हा सामन्यात जवळपास 120 षटके शिल्लक होती. अशा स्थितीत इंग्लंड हा सामना हरु शकतो, असे मानले जात होते. सामन्याच्या 5 व्या दिवशी पाकिस्तानने दुसऱ्या डावात 2 बाद 80 धावांवर पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र शेवटच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानचा संघ सर्वबाद झाला होता.

PAK vs ENG
Eng vs Pak: पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी धावून आला इंग्लंडचा कर्णधार! जाणून घ्या

आघाडीच्या 5 फलंदाजांपैकी 4 फलंदाजांनी शतकी खेळी केली

इंग्लंडसाठी पहिल्या डावात जॅक क्रॉली, बेन डकेट, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑली पोप आणि पाचव्या क्रमांकावर असलेल्या हॅरी ब्रूक यांनी शतके झळकावली. संघाचे सलामीवीर जॅक क्रोली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 35.4 षटकांत 233 धावांची भागीदारी केली. या सामन्याच्या पहिल्या दिवसापासूनच इंग्लंडने पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले. त्याचबरोबर कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी 500 धावा करणारा इंग्लंड संघ पहिला संघ ठरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com