Padma Shri awardee Brahmanand Sankhwalkar
Padma Shri awardee Brahmanand Sankhwalkar Dainik Gomantak
क्रीडा

योगदान देत गेलो, बहुमान मिळत राहिले : ब्रह्मानंद शंखवाळकर

किशोर पेटकर

पणजी : फुटबॉलच्या उत्कट प्रेमापोटी योगदान देत गेलो, कधीच पुरस्काराची अपेक्षा बाळगली नाही, बहुमान मिळत राहिले, अशा शद्बांत पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झालेले गोव्याचे महान फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी मंगळवारी भावना व्यक्त केली.

गोमंतकीय क्रीडाक्षेत्रात `पद्मश्री`ने सन्मानित होणारे ब्रह्मानंद पहिलेच खेळाडू आहेत. यापूर्वी 1997 सालच्या अर्जुन पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली होती, तेव्हाही ते हा पुरस्कारप्राप्त पहिले गोमंतकीय क्रीडापटू ठरले होते. भारतीय फुटबॉलमधील सर्वोत्तम गोलरक्षकांत ब्रह्मानंद अव्वल आहेत. (Padma shri awardee brahmanand sankhwalkar News Updates)

'फुटबॉलमध्ये (Football) पाच दशकांहून जास्त काळ मी कार्यरत आहे. कधी कंटाळा आला नाही. फुटबॉलने मला नेहमीच आनंद दिला, प्रोत्साहित केले. नावलौकिक, प्रतिष्ठा मिळवून दिली. आता पद्मश्रीसाठी निवड झाल्याची भावना अवर्णनीय आहे. वेगळीच ऊर्जा प्राप्त झाली आहे. तंदुरुस्ती महत्त्वाची. त्यावर भर देत फुटबॉलसाठी यापुढेही वाहून घेईन, थांबायचे नाही,' असे 67 वर्षीय भारताच्या माजी फुटबॉल संघ कर्णधाराने 'गोमन्तक'ला सांगितले.

पद्मश्रीसाठी निवड सुखद धक्का

'सर्वोत्तम कामगिरी हेच ध्येय नेहमी बाळगले. स्वतःला प्रेरित करण्यावरच माझा भर असतो. सर्वोत्कृष्ट बनण्याचीच स्वप्ने पाहिले. पद्मश्री (Padma Shri) पुरस्कार खूप सुखद आणि समाधान देणारा आहे,' असे ब्रह्मानंद यांनी ताळगाव येथील आपल्या निवासस्थानी प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा आनंद व्यक्त करताना सांगितले.

पाच दशकांचे निःस्वार्थी योगदान

फुटबॉल गोलरक्षक, प्रशिक्षक, प्रशासक या नात्याने भारतीय आणि गोमंतकीय फुटबॉलमधील ब्रह्मानंद यांचे योगदान पाच दशकांचे आहे. त्यांनी सांगितले, 'पद्मश्रीसाठी निवड होणे हा माझ्या फुटबॉलमधील 51 वर्षांच्या निःस्वार्थी योगदानाचा सन्मान आहे. केवळ माझा एकट्याचा नसून समस्त गोमंतकीय आणि फुटबॉलचा बहुमान आहे. देवाचा मी आभारी आहे.'

वयाच्या 15 व्या वर्षी फुटबॉल मैदानावर

वयाच्या 15 व्या वर्षी ब्रह्मानंद यांनी फुटबॉल मैदानावरील कारकिर्दीस सुरवात केली. त्यानंतर चढता आलेख अनुभवत गेले. भारतीय संघाचे कर्णधार बनले, त्यांच्या नेतृत्वाखालील गोव्याने (Goa) दोन वेळा संतोष करंडकही जिंकला. या स्पर्धेत तब्बल 576 मिनिटे गोल न स्वीकारण्याचा राष्ट्रीय विक्रमही केला. दशकातील सर्वोत्तम भारतीय फुटबॉलपटू या किताबानेही ते सन्मानित झाले. ब्रह्मानंद अजूनही पूर्ण तंदुरुस्तीने मैदानावर फुटबॉल खेळतात, आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ युवा फुटबॉलपटूंना देण्याच्या उद्देशाने ते प्रशिक्षणातही रमलेले असतात.

ब्रह्मानंद शंखवाळकर यांच्याविषयी...

  • भारतातील सर्वोत्तम फुटबॉल गोलरक्षकांपैकी एक

  • 1997 सालचा अर्जुन पुरस्कार, गोव्याचे पहिले क्रीडापटू

  • अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे दशकातील (1985-1995) सर्वोत्तम फुटबॉलपटू

  • दोन वेळा (1982-83 व 1983-84) संतोष करंडक विजेत्या गोव्याचे कर्णधार

  • भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार, 1975 मध्ये भारतातर्फे आंतरराष्ट्रीय पदार्पण

  • गोव्यातील पानवेल स्पोर्टस क्लब, साळगावकर क्लब, चर्चिल ब्रदर्स, अँडरसन मरिन संघाचे प्रतिनिधित्व (1971 ते 1995)

  • 1995 साली स्पर्धात्मक फुटबॉलमधून निवृत्ती, 50 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने

  • 1997 ते 2005 या कालावधीत भारतीय फुटबॉल संघाचे गोलरक्षक प्रशिक्षक

  • 2014 साली गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सेवेतून प्रशिक्षण संचालक या नात्याने निवृत्त

  • सेझा फुटबॉल अकादमीत विविध पदांवर कार्यरत

  • जुलै 2020 मध्ये गोवा फुटबॉल विकास मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

फुटबॉलपटू या नात्याने जिंकलेले करंडक

  • बांदोडकर गोल्ड ट्रॉफी : 1974, 1981, 1988

  • टीएफए शिल्ड : 1979, 1982

  • नेहरू कप : 1985

  • रोव्हर्स कप : 1990

  • फेडरेशन कप : 1988, 1989

  • संतोष करंडक : 1982-83, 1983-84

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT