सुनील छेत्रीची आयएसएल विक्रमाशी बरोबरी

स्पर्धेत 48 गोल, बंगळुरुने पिछाडीवरुन एफसी गोवाला रोखले
Sunil Chetri ISL
Sunil Chetri ISLDainik Gomantak

पणजी : दीर्घानुभवी आघाडीपटू सुनील छेत्री याने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत विक्रमाशी बरोबरी साधणारा 48 वा गोल रविवारी रात्री बांबोळी ॲथलेटिक स्टेडियमवर नोंदवला. माजी विजेत्या बंगळूर एफसीला कर्णधाराच्या उत्तरार्धातील या कामगिरीमुळे पिछाडीवरून एफसी गोवा संघास 1-1 असे गोलबरोबरीत रोखणे शक्य झाले. (ISL Latest News Updates)

Sunil Chetri ISL
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचा केएल राहुलवर झाला मोठा परिणाम

ऑस्ट्रेलियन बचावपटू डिलन फॉक्स याचे हेडिंग 41 व्या मिनिटास निर्णायक ठरल्यानंतर, छेत्रीने हेडिंगद्वारे बंगळूरला (Bangalore) 61 व्या मिनिटास बरोबरी साधून दिली. सामन्याच्या 69 व्या एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंग याने अफलातून कौशल्य प्रदर्शित करत पूर्णपणे झेपावत रोशन नाओरेम याचा प्रयत्न उधळून लावला. भरपाई वेळेत छेत्रीचा ताकदवान फटका गोलपट्टीस आपटला. त्यामुळे बंगळूरची आघाडी हुकली व गोलबरोबरीही कायम राहिली. ईस्ट बंगालविरुद्ध मागील लढतीत अतिशय कमजोर बचाव केलेल्या एफसी गोवाने रविवारी खेळात खूपच सुधारणा केली.

Sunil Chetri ISL
आर्लेम स्पोर्टस क्लब लोलयेकर करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत

बंगळूर व एफसी गोवा (FC Goa) यांची स्पर्धेच्या आठव्या मोसमातील ही प्रत्येकी पाचवी बरोबरी ठरली. दोन्ही संघांचे समान 14 गुण झाले. 12 सामने खेळलेल्या बंगळूरचा (+1) आठवा, तर 13 सामने खेळलेल्या एफसी गोवाचा (-5) नववा क्रमांक कायम राहिला. पहिल्या टप्प्यात एफसी गोवाने बंगळूरला 2-1 फरकाने हरविले होते.

Sunil Chetri ISL
रवी शास्त्रींनी केला विराट कोहली बद्दलचा मोठा खुलासा!

अखेर छेत्रीचा मोसमात गोल

आयएसएल स्पर्धेत यंदा सुनील छेत्रीचा गोल दुष्काळ बाराव्या सामन्यात संपुष्टात आला. मोसमातील 694 व्या मिनिटास गोल नोंदवत या 37 वर्षीय हुकमी स्ट्रायकरने आयएसएल (ISL) विक्रमाशी बरोबरी साधली, तसेच त्याने बंगळूर एफसीची सामन्यातील पिछाडीही भरून काढली. सामन्यात तासाभराच्या खेळानंतर प्रिन्स इबारा याच्या अप्रतिम क्रॉसपासवर छेत्रीचे हेडिंग अतिशय वेगवान ठरले, यावेळी गोलरक्षक धीरज सिंगला चेंडूच्या वेगाचा अजिबात अंदाज आला नाही. 106 आयएसएल सामन्यातील छेत्रीचा हा 48 वा गोल ठरला. त्यासाठी त्याला सात मोसम खेळावे लागले. एफसी गोवातर्फे 2017 ते 2020 या कालावधीत स्पॅनिश आघाडीपटू फेरान कोरोमिनास याने 57 सामन्यांत 48 गोल केले होते.

Sunil Chetri ISL
IND vs SA: दीपक चहरचा चमत्कार, टीम इंडियाला 3 वर्षांनंतर यश

फॉक्सचा पहिलाच गोल

विश्रांतीला चार मिनिटे बाकी असताना सेटपिसेसवर एफसी गोवाने आघाडी प्राप्त केली. यावेळी ऑस्ट्रेलियन बचावपटू डिलन फॉक्स याने वैयक्तिक पहिला आयएसएल गोल नोंदविला. स्पॅनिश मध्यरक्षक होर्गे ओर्तिझच्या शानदार फ्रीकिकवर फॉक्सने अगदी जवळून हेडिंगद्वारे चेंडूला नेटची दिशा दाखविली. मोसमात ओर्तिझच्या असिस्टवर पाचव्यांदा गोल झाला. त्यापूर्वी 12व्या मिनिटास एफसी गोवास जोरदार धक्का बसला. हुकमी मध्यरक्षक ग्लॅन मार्टिन्सचे स्नायू दुखावल्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावे लागले आणि प्रिन्सटन रिबेलोने त्याची जागा घेतली. सामन्यात एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंग डोक्यावरील बँडेजसह खेळला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com