Softball Tournament Press Conference Dainik Gomantak
क्रीडा

Softball Tournament : कांपाल येथे फेडरेशन कप सॉफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन

सोमवारपासून सुरवात : पुरुष, महिला गटात प्रत्येकी ९ संघांत चुरस

किशोर पेटकर

देशातील प्रमुख राज्य संघांचा समावेश असलेली 13वी फेडरेशन कप राष्ट्रीय पुरुष व महिला सॉफ्टबॉल स्पर्धा 1 ते 3 मे कालावधीत कांपाल-पणजी येथील गोवा क्रीडा प्राधिकरण मैदानावर होईल, अशी माहिती गोवा सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष धर्मा चोडणकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

दोन्ही गटात प्रत्येकी नऊ संघांचा समावेश आहे. पुरुष गटात यजमान गोव्यासह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, हरियाना, दिल्ली, राजस्थान, चंडीगड हे संघ, तर महिला गटात गोव्यासह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, हरियाना, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा, केरळ, पंजाब या संघांत चुरस राहील.

स्पर्धा आयोजनात गोवा सरकारचे महत्त्वपूर्ण पाठबळ लाभले असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री गोविंद गावडे यांचे आभार मानले.

स्पर्धा गोवा क्रीडा प्राधिकरण, क्रीडा व युवा व्यवहार खाते आणि भारतीय सॉफ्टबॉल संघटनेच्या सहकार्याने घेतली जाईल. दोन्ही गटातील अंतिम लढती 3 मे रोजी होतील. पत्रकार परिषदेस आयोजन समिती कार्याध्यक्ष रुपेश ठाणेकर, उपकार्याध्यक्ष मोनिका लोबो दोरादो, आयोजन सचिव अभिजित शेजवलकर, सदस्य वेसबॉन मोराईस, ॲड. नीतिशा यांची उपस्थिती होती.

राष्ट्रीय स्पर्धा सहभागामुळे महत्त्व

सॉफ्टबॉल खेळाचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. गतवर्षी गुजरातमध्ये झालेल्या 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सॉफ्टबॉलला स्थान मिळाले. हा खेळ गोव्यात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नियोजित असलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही आहे. त्यामुळे यजमान या नात्याने गोव्यासाठी सॉफ्टबॉलमधील कामगिरी महत्त्वपूर्ण असल्याचे चोडणकर यांनी नमूद केले.

गोव्यातील सॉफ्टबॉलविषयी...

गोवा सॉफ्टबॉल संघटनेने 1990 साली या खेळाची बिजे गोव्यात रुजविली. तेव्हापासून संघटनेने राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा गोव्यात घेतल्या आहेत. राष्ट्रीय स्पर्धांत गोव्याच्या सॉफ्टबॉल संघाने सुवर्ण, रौप्य, ब्राँझपदकांची कमाई केली आहे.

गोमंतकीय सॉफ्टबॉलपटूंनी देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले असून गोव्याच्या मोनिका लोबो यांनी आशियाई महिला सॉफ्टबॉल स्पर्धेत भारताचे नेतृत्त्व केले होते, अशी माहिती चोडणकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Red Fort Blast: 2023 पासून दिल्ली 'टार्गेट'वर! बॉम्बस्फोटाची तयारी 2 वर्षांपासून सुरू होती; धक्कादायक खुलासा समोर

Bicholim News:डिचोली शहराची सुरक्षा बेभरवशाची; 1 कोटी रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे 'शोभेची वस्तू'!

IND vs SA ODI Series: द. आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर; रोहित- विराट खेळणार की नाही? नव्या कर्णधाराचीही घोषणा

"अहवालानंतरच बोलेन!", पूजा नाईकच्या आरोपांवर वीजमंत्री ढवळीकरांची प्रतिक्रिया; Watch Video

Bike Stunt Viral Video: यांना कायद्याची भीती नाही? गोव्यात तरूणांची हुल्लडबाजी; चालत्या दुचाकीवर उभं राहून धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT