IPL 2023: RR च्या चाहत्यांना मोठा झटका, CSK विरुद्ध खेळणार नाही 'हा' धाकड गोलंदाज!

RR vs CSK, Playing-11: इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 37 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने आहेत.
Rajasthan Royals
Rajasthan RoyalsDainik Gomantak

RR vs CSK, Playing-11: इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 37 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने आहेत.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जला पहिल्यांदा गोलंदाजीसाठी आमंत्रित केले.

एकीकडे चेन्नई सुपर किंग्जचा संघ खेळल्या गेलेल्या 7 पैकी 5 सामन्यात विजय मिळवत अव्वल स्थानावर आहे.

त्याचवेळी, रॉयल्सने 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत. नाणेफेकीसोबतच राजस्थान रॉयल्स संघ आणि चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

कॅप्टनने सांगितले

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेकीच्या वेळीच चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी सांगितली आहे.

वास्तविक, संघाचा या हंगामातील यशस्वी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट या सामन्यात खेळत नाही. नाणेफेकीच्या वेळीच संजूने याबाबत माहिती दिली. त्याच्या जागी अॅडम झाम्पाचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.

Rajasthan Royals
IPL 2023: सनरायझर्स हैदराबादला मोठा झटका, 'हा' मॅच विनर खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (डब्ल्यूके/सी), सिमरन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, यजुवेंद्र चहल.

Rajasthan Royals
IPL 2023: RR ला टक्कर देण्यासाठी धोनीच्या CSK ची खतरनाक रणनिती, प्लेइंग 11 मध्ये...

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad), डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (डब्ल्यूके/सी), मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, महेश टेकशाना, आकाश सिंग

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com