Tokyo Olympics Dainik Gomantak
क्रीडा

Olympics: ‘टोकियो’ ने जगाला दिला जिद्दीचा संदेश

लेनी डिगामा : कोविड संकटकाळातही ऑलिंपिक (Tokyo Olympics) यशस्वी; क्रीडा जगताकडूनही कौतुक

किशोर पेटकर

पणजी : कोरोना विषाणू महामारीमुळे (Covid-19) विरोध, तसेच धोकाही होता, प्रतिकूल परिस्थितीत टोकियो ऑलिंपिकने (Tokyo Olympics) यशस्वी आयोजनाद्वारे जिद्दीचा अनोखा संदेश जगाला दिला, असे मत बॉक्सिंगमधील आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी (ITO) लेनी डिगामा यांनी व्यक्त केले.

गोव्याचे लेनी टोकियोत बॉक्सिंगमधील एकमेव आशियाई तांत्रिक अधिकारी होते. शनिवारी त्यांचे गोव्यात आगमन झाले. आशियाई बॉक्सरच्या लढती वगळता त्यांनी अन्य लढतींत मूल्यांकनकर्ते-निरीक्षक म्हणून काम पाहिले. ऑलिंपिकचा अनुभव त्यांनी ‘गोमन्तक’ कडे व्यक्त केला. ते म्हणाले ‘‘कोविड-19च्या पार्श्वभूमीवर स्पर्धा अतिशय सफल ठरली. खूपच चांगले आणि नियोजनबद्ध आयोजन यामुळे महामारीच्या कालावधीतही स्पर्धा संस्मरणीय ठरली. अनुचित प्रकार टाळले गेले. माझ्यासाठी हा अनुभव चिरकाल स्मरणात राहील.’’

वेळोवेळी चाचण्या; खास ॲपही

आरटीपीसीआर चाचणी, लाळेची चाचणी या ऑलिंपिक वास्तव्यात नित्याच्याच ठरल्या. हॉटेल पंचतारांकित असले, तरी आतमध्ये जाताना स्वतःचे सामान स्वहस्तेच न्यावे लागत असे. ऑलिंपिक आयोजन समितीचे कोविड-19 विषयक खास ॲप होते, तेथे दररोज सकाळी शरीराचे तापमान, ताप-थंडी-खोकला आदींची माहिती नोंदीत करणे बंधनकारक होते. स्टेडियमवर जाण्यापूर्वी, तसेच लढतीच्या वेळेस स्टेडियममध्ये वापरण्यासाठी वेगवेगळे पोशाख होते. सारं काही काटेकोरपणे अमलात येत होते, यामुळेच टोकियो ऑलिंपिक स्पर्धा सफल ठरली.

केवळ बसमधून टोकियो दर्शन

कोरोना विषाणू महामारीमुळे ऑलिंपिकमधील सुट्टीच्या एका दिवशी फक्त बसमधून टोकियोची भ्रमंती करण्याची संधी मिळाली. बसमधून सारी प्रेक्षणीय स्थळे पाहायची सोय होती, कोणालाच खाली उतरण्याची परवानगी नव्हती. खास पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉक्सिंगमधील सारे अधिकारी वास्तव्यास होते.

"कठीण कालखंडात झालेली ऑलिंपिक स्पर्धा विशेष होती. टोकियोने जिद्द आणि साहस यांचे अनोखे दर्शन घडविले. त्यासाठी जपान, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती आणि स्पर्धा आयोजन समितीला सलाम ठोकावाच लागेल. एक भारतीय या नात्याने स्पर्धेत जबाबदारी सार्थपणे पेलली याचाही अभिमान वाटतो."

-लेनी डिगामा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT