भारताने (India) इंग्लंडविरुद्धच्या (England) दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी (IND vs ENG 2nd Test) रविवारी दुसऱ्या डावात 6 गडी गमावून 181 धावा केल्या. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या या कसोटी सामन्यात भारताकडे एकूण 154 धावांची आघाडी आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा यांच्या भागीदारीने टीम इंडियाने पुनरागमन केले, परंतु दोघेही दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच पॅव्हेलियनमध्ये परतले. आक्रमक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) 14 आणि इशांत शर्मा 4 धावा करत क्रीजवर होते.
दुपारनंतर भारताने 56 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर रहाणे आणि पुजाराने शतकी भागीदारी केली. मार्क वुडने (Mark Wood) रहाणे आणि पुजाराची भागीदारी तोडली. त्याने डावाच्या 73 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जो रुटकडे पुजाराला झेलबाद केले. पुजाराने 206 चेंडू खेळून 4 चौकारांच्या मदतीने 45 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर रहाणेने जोस बटलरलाही मोईन अलीकडे झेलबाद केले. रहाणेने 146 चेंडूंचा सामना केला आणि 5 चौकारांच्या मदतीने 61 धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 24 वे अर्धशतक चौकारांसह पूर्ण केले. त्याने डावाच्या 68 व्या षटकाच्या 5 व्या चेंडूवर चौकार ठोकला, त्यासह अर्धशतकही पूर्ण झाले. पुजारा आणि रहाणेने 100 धावा जोडल्या.
रवींद्र जडेजाकडून अपेक्षा होत्या पण तो मोईनच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. खराब प्रकाशामुळे खेळ नंतर 82 षटकांनंतर रद्द करण्यात आला. त्यानंतर थोड्याच वेळात खेळ संपण्याची घोषणाही करण्यात आली. याआधी दुसऱ्या सत्रात 28 षटकांत फक्त 49 धावा झाल्या, भारताने एकही विकेट गमावली नव्हती. तत्पूर्वी, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने फॉर्ममध्ये असलेल्या भारताच्या सलामीवीरांना स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवून सामन्यावरील यजमानपदाची पकड दुपारपर्यंत मजबूत केली.
भारताचे तीन खेळाडू बाद झाले त्यावेळी केवळ फक्त 55 धावा होत्या. सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा फलंदाजीसाठी आले मात्र त्यांना आपेक्षित अशा धावा काढता आल्या नाहीत. अशा परिस्थितीत कर्णधार विराट कोहलीही जो रूटसारखी अपेक्षित खेळी करण्यात अपयशी ठरला. कोहलीने 31 चेंडूंमध्ये 20 धावा केल्या आणि सॅम करेनकडे झेल दिला.
रुटने वुडला गोलंदाजी करण्यासाठी चेंडू दिला आणि वुडने टीम इंडियाच्या खेळाडूंना पॅव्हेलियनची वाट दाखवली. पहिल्या डावात शतक ठोकणारा राहुल 30 चेंडूत पाच धावा करून बाद झाला. त्याचवेळी, रोहितने मालिकेत दुसऱ्यांदा पुल शॉट खेळत 36 चेंडूत 21 धावा केल्यानंतर तो बाद झाला. वुडला षटकार मारल्यानंतर रोहितला त्याच षटकात तशाच प्रकारचा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात बॅकवर्ड स्क्वेअरवर झेलबाद झाला. इंग्लंडसाठी वेगवान गोलंदाज मार्क वुडने 14 षटकांत 40 धावा देऊन 3 बळी घेतले तर मोईन अलीला (Moin Ali) 2 बळी मिळाले. सॅम करेनने विराट कोहलीची विकेट घेतली आणि 15 षटकांत 30 धावा दिल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.