प्रिन्सटन रिबेलो Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: प्रिन्सटन रिबेलोची एफसी गोवाला सोडचिठ्ठी, ओडिशा क्लबशी कायमस्वरूपी करार

एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघातून सीनियर चमूत आलेला प्रिन्सटन आयएसएल स्पर्धेत एकूण 45 सामने खेळला

किशोर पेटकर

एफसी गोवाचा मध्यरक्षक प्रिन्सटन रिबेलो आता ओडिशा एफसी संघात दाखल झाला असून त्याने कायमस्वरूपी करार केल्याचे भुवनेश्वर येथील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल क्लबने गुरुवारी जाहीर केले. यावेळच्या मोसमात गोव्यातील संघातर्फे त्याला खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही.

एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघातून सीनियर चमूत आलेला प्रिन्सटन आयएसएल स्पर्धेत एकूण 45 सामने खेळला, पण यंदा 16 पैकी तीनच सामन्यात त्याला प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी मैदानात उतरविले. तिन्ही वेळेत त्याला बेंचवरून खेळावे लागले. ओडिशा संघातर्फे तो आता जोसेप गोम्पाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळेल.

लक्षवेधक युवा मध्यरक्षक

प्रिन्सटन 2017 साली एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघात दाखल झाला. त्यानंतर तो लोनवर इंडियन ॲरोजतर्फे आय-लीग स्पर्धेत खेळला. 2019-20 मोसमात त्याने एफसी गोवाच्या मुख्य संघात तत्कालीन प्रशिक्षक सर्जिओ लोबेरो यांच्या मार्गदर्शनाखाली पदार्पण केले.

त्या मोसमात तो आयएसएल स्पर्धेत आठ सामने खेळला. त्यानंतर आयएसएल स्पर्धेत हुआन फेर्रांडो यांच्या मार्गदर्शनाखाली 2020-21 मोसमात 17 सामन्यात 722 मिनिटे, तर 2021-22 मोसमात 17 सामन्यात 963 मिनिटे खेळला. मात्र यंदा तो एफसी गोवा संघातील स्थान मजबूत करू शकला नाही.

दोन करंडकांचा मानकरी

एफसी गोवाने 2019-20 मध्ये आयएसएल स्पर्धेत लीग विनर्स शिल्ड पटकावली. या संघाने 2021 मध्ये ड्युरँड कप जिंकला. दोन्ही वेळेस प्रिन्सटन एफसी गोवा संघाचा सदस्य होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT