Team India World Cup Schedule 2027 Dainik Gomantak
क्रीडा

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Team India World Cup Schedule 2027: 2027 मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपची क्रिकेट चाहत्यांना आतापासूनच उत्सुकता लागली आहे. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामन्याची तारीखही निश्चित झाली आहे.

Sameer Amunekar

2027 मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपची क्रिकेट चाहत्यांना आतापासूनच उत्सुकता लागली आहे. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामन्याची तारीखही निश्चित झाली आहे. आयसीसीच्या माहितीनुसार, 2027 च्या वनडे विश्वचषकाला 2 ऑक्टोबर 2027 रोजी सुरुवात होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना 21 नोव्हेंबर 2027 रोजी खेळवला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 10 ऑक्टोबर 2027 रोजी रंगणार आहे.

भारत-पाकिस्तान एकाच गटात

विश्वचषकासाठी भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. ग्रुप एमध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि क्वालिफायर ए या संघांचा समावेश आहे. त्यामुळे भारताला साखळी फेरीत पाकिस्तानसोबतच ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानसारख्या संघांचेही आव्हान असेल.

दुसरीकडे, ग्रुप बीमध्ये बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड आणि क्वालिफायर बी हे संघ असतील. क्वालिफायरमधून येणाऱ्या दोन्ही संघांची नावे नंतर निश्चित होतील.

तीन देशांमध्ये रंगणार विश्वचषक

2027 चा वनडे वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार आहे. स्पर्धेतील बहुतांश सामने दक्षिण आफ्रिकेत खेळवले जाणार आहेत. यावेळी एकूण 57 सामने होणार असून अंतिम सामना 21 नोव्हेंबरला होईल.

2023 मध्ये झालेल्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे आगामी स्पर्धेत भारतीय संघाला पुन्हा एकदा विश्वविजेतेपद मिळवण्याची संधी असेल.

14 संघांचा सहभाग, स्पर्धेचे स्वरूप वेगळे

2027 च्या विश्वचषकात एकूण 14 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात कमी क्रमवारीतील तीन संघांमध्ये सुपर सीरिज खेळवली जाणार आहे. त्यातून दोन संघ स्पर्धेबाहेर जातील, तर एका संघाला मुख्य स्पर्धेत स्थान मिळेल.

यानंतर 12 संघांचे दोन गट केले जातील. साखळी फेरीतील कामगिरीच्या आधारे पुढील टप्प्यासाठी संघांची निवड केली जाईल. त्यानंतर सुपर स्टेजमध्ये सामने होतील आणि या टप्प्यातील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यामुळे प्रत्येक सामन्याला विशेष महत्त्व असणार आहे.

भारताचा साखळी फेरीतील कार्यक्रम

भारतीय संघाच्या साखळी सामन्यांनाही अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. भारताचा पहिला सामना 7 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 10 ऑक्टोबरला पाकिस्तानशी सामना होईल.

भारताचे साखळी सामन्यांचे वेळापत्रक:

  • 7 ऑक्टोबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

  • 10 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान

  • 14 ऑक्टोबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान

  • 17 ऑक्टोबर: भारत विरुद्ध क्वालिफायर ए

  • 24 ऑक्टोबर: भारत विरुद्ध झिम्बाब्वे

भारत-पाकिस्तान सामन्यामुळे 2027 च्या विश्वचषकातील सर्वाधिक चर्चेचा सामना कोणता असेल, याची दिशा आतापासूनच स्पष्ट झाली आहे. मात्र स्पर्धा मोठी असल्याने भारतासमोर साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानसह इतर संघांचेही आव्हान असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward Panel: दामोदर कॉलेज विद्यार्थी मंडळ निवडणुकीत 'गोवा फॉरवर्ड'चा झेंडा; चारही प्रमुख जागा पॅनलच्या ताब्यात

VIDEO: देवीची मूर्ती आणताना काळाचा घाला! दुर्गोत्सवाच्या तयारीला गालबोट, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू; 21 जखमी

Diveagar Beach Tragedy: दिवेआगर समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू; सहलीसाठी आलेल्या आळंदीतील विद्यार्थ्यांवर काळाचा घाला

LPG Price: व्यावसायिक गॅस सिलिंडर 70 रुपयांनी महागला; घरगुती गॅसचे दर मात्र 'जैसे थे'

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

SCROLL FOR NEXT