Kobe Bryant | Novak Djokovic Dainik Gomantak
क्रीडा

Video: जोकोविचने 24 वे ग्रँडस्लॅम जिंकताच का घातला कोबी ब्रायंटच्या नावाचा टी-शर्ट, स्वत:च केला मोठा खुलासा

Novak Djokovic Video: नोवाक जोकोविचने अमेरिकन ओपन जिंकल्यानंतर 'माम्बा-फॉरेवर' लिहिलेला टी-शर्ट घातला होता.

Pranali Kodre

Novak Djokovic tribute to Kobe Bryant after US Open grand slam win by donning 24 number t-shirt:

रविवारी सार्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने अमेरिकन ओपन 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकत इतिहास रचला आहे. त्याने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवला 6-3 7-6(5) 6-3 अशा फरकाने तीन सेटमध्ये पराभूत केले आणि विजेतेपदाला गवसणी घातली.

जोकोविचचे हे कारकिर्दीतील 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले. त्यामुळे जोकोविचने एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

दरम्यान, त्याने हे विजेतेपद जिंकल्यानंतर दिग्गज बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटच्या नाव लिहिलेला आणि 24 क्रमांक असलेला टी-शर्ट घातला होता. त्याच्या टी-शर्टवर 'माम्बा-फॉरेव्हर' असे लिहिले होते. कोबी ब्रायंटला माम्बा म्हणूनही ओळखले जायचे.

Kobe Bryant Daughter

ब्रायंटचा वयाच्या ४१ व्या वर्षी २६ जानेवारी २०२० रोजी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याची १३ वर्षांची मुलगी गियाना (गिगी) आणि इतर आठ जणांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यावेळी या दुर्दैवी घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

दरम्यान, जोकोविचने ब्रायंटच्या नावाचा टीशर्ट घालण्याबद्दल अंतिम सामन्यानंतर खुलासा केला. तो म्हणाला, 'खरंतर, सात दिवसांपूर्वी मी विचार केला की जर मला ही स्पर्धा जिंकण्याची संधी मिळाली, तर मी हा मी हा टी-शर्ट घालेल. मी तोपर्यंत कोणालाही याबद्दल बोललो नव्हतो. काही दिवसांपूर्वी मी माझ्या लोकांना हा टी-शर्ट करण्यासाठी मदत मागितली.'

'कोबी माझा जवळचा मित्र होता. तो विजेत्याच्या मानसिकतेबद्दल नेहमी बोलायचा. जेव्हा मी दुखापतीमुळे संघर्ष करत होतो आणि पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत होतो, पुन्हा माझ्या खेळात सर्वोच्च स्थरावर पोचण्यासाठी काम करत होतो, तेव्हा मी सर्वात जास्त अवलंबून असणाऱ्या लोकांपैकी तो होता.तो कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शनासाठी, मैत्रीपूर्ण कोणत्याही प्रकारच्या पाठींब्यासाठी नेहमी असायचा.'

'काहीवर्षांपूर्वी तो आणि त्याची मुलगी गेली, तेव्हा जे झाले, त्याचा माझ्यावर खोलवर आघात झाला. मला वाटते 24 क्रमांकाची जर्सी त्याने तो लेकर्ससाठी आणि बास्केटबॉल विश्वात दिग्गज झाला, तेव्हा घातली होती. त्यामुळे मला वाटले की त्याने जे काही मिळवले आहे, त्याच्या सन्मानार्थ काहीतरी प्रतिकात्मक करणे शानदार असेल.'

दरम्यान, जोकोविचने रविवारी चौथे अमेरिकन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने यापूर्वी 10 ऑस्ट्रेलियन ओपन, 3 फ्रेंच ओपन आणि 7 विम्बल्डन अशी मिळून एकूण 24 ग्रँडस्लॅम विजेतीपदे जिंकली आहेत.

तसेच जोकोविचचे हे यावर्षीचे तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. त्यामुळे तो पहिलाच खेळाडू ठरला आहे, ज्याने चार वेळा एका वर्षात तीन ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. त्याने यापूर्वी 2011, 2015 आणि 2021 साली असा कारनामा केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेची पडताळणी होणार, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार; मुख्यमंत्र्यांची तंबी

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठी भेट; 6 अतिरिक्त विशेष गाड्यांची केली घोषणा!

Sunburn Festival 2025: बरं झालं! सनबर्न गोव्याबाहेर गेल्यावर मंत्री नाईकांची प्रतिक्रिया; म्हणाले, आपली संस्कृती-परंपरा सुरक्षित राहील

Ravichandran Ashwin: 'तुम्ही जे पेराल ते उगवेल'! स्टोक्सच्या 'मस्करी'ला अश्विनचे सडेतोड उत्तर; जाणून घ्या नेमके प्रकरण?

Numerology: जन्मतारखेत दडलेय 'कर्माचे फळ'; या तारखांना जन्मलेल्यांना संघर्ष आणि यशासाठी वाट का पहावी लागते?

SCROLL FOR NEXT