...मी सेलिब्रेशन चोरले', जोकोविचने सांगितलं US Open फायनलमध्ये पोहचल्यानंतरच्या कृतीमागचं कारण

Novak Djokovic: अमेरिकन ओपनच्या सेमीफायनलमध्ये बेन शेल्टनविरुद्ध विजय मिळवल्यानंतर जोकोविचने 'फोन कॉल' सेलिब्रेशन केले होते.
Novak Djokovic
Novak DjokovicDainik Gomantak
Published on
Updated on

Novak Djokovic open up on imitating Ben Shelton's phone celebration after US Open Semi Final Match:

अमेरिकन ओपन 2023 स्पर्धेत शुक्रवारी रात्री पुरुष एकेरीची उपांत्य फेरी पार पडली. या फेरीत 23 ग्रँडस्लॅम विजेत्या नोवाक जोकोविचने बिगर मानांकित बेन शेल्टनला पराभूत केले आणि 10 व्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. दरम्यान, उपांत्य सामना जिंकल्यानंतर जोकोविचने केलेले सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरला.

सार्बियाच्या जोकोविचने 20 वर्षीय शेल्टनला 6-3, 6-2, 7-6(4) अशा फरकाने तीन सेटमध्ये पराभूत केले. त्यानंतर जोकोविचने 'फोन कॉल' सेलिब्रेशन केले. खरंतर शेल्टन अशा सेलिब्रेशनसाठी ओळखला जातो. तो बऱ्याचदा असे सेलिब्रेशन करतो. त्यामुळे त्याच्याप्रमाणेच जोकोविचने जिंकल्यानंतर सेलिब्रेशन केल्याने त्याची बरीच चर्च झाली.

दरम्यान, याबद्दल दोन्ही खेळाडूंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जोकोविचने शेल्टनच्या सेलिब्रेशनची कॉपी करण्यामागील कारण पत्रकार परिषदेत सांगितले की 'मला बेनचे सेलिब्रेशन आवडले, ते खूप खरेखुरे होते आणि मी त्याची कॉपी केली. मी त्याचे सेलिब्रेशन चोरले.'

तसेच जोकोविचने शेल्टनच्या खेळाचेही कौतुक केले आहे. त्याने म्हटले आहे की त्याचे सर्व्ह गतिशील आहेत आणि अनिश्चित आहेत, ज्यामुळे पुढे काय होईल, हे सांगता येत नाही.

दरम्यान, जोकोविचने केलेल्या फोन कॉल सेलिब्रेशनबद्दल शेल्टन म्हणाला, 'मोठा होत असताना मी नेहमीच शिकलो की कॉपी करणे हे एखाद्याबद्दल चांगले बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे, इतकेच मी सांगू शकतो.'

त्याचबरोबर त्याने त्याच्या अशा सेलिब्रेशनचे कारण सांगितले की लहानपणी तो त्याच्या मित्रांना खेळायला जाण्यासाठी फोन करायचा. त्याचमुळे तो म्हणाला, 'अशाप्रकारचे सेलिब्रेशन मला घरी असलेल्या माझ्या मित्रांशी जोडते.'

जोकोविच खेळणार अंतिम सामना

जोकोविच आता रविवारी रात्री 36 व्यांदा ग्रँडस्लॅमचा अंतिम सामना खेळताना दिसणार आहे. यावेळी तो विक्रमी 24 वे ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी खेळेले. त्याच्यासमोर अंतिम सामन्यान रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचे आव्हान असणार आहे. मेदवेदेवने उपांत्य फेरीत कार्लोस अल्कारेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

महिलांचा अंतिम सामना शनिवारी

दरम्यान, शनिवारी रात्री 19 वर्षीय कोको गॉफ विरुद्ध एरिना सबलेंका यांच्यात महिला एकेरीचा अंतिम सामना रंगणार आहे. या दोघींनीही पहिल्यांदाच अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असल्याने यंदा या स्पर्धेला महिलांच्या एकेरी स्पर्धेत नवा विजेता मिळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com