Shreyas Iyer | Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Shreyas Iyer: टीम इंडियालाच नाही KKR लाही धक्का? रोहित शर्माने दिले अय्यरबद्दल महत्त्वाचे हेल्थ अपडेट्स

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अहमदाबाद कसोटीदरम्यान श्रेयस अय्यरच्या पाठदुखीने डोके वर काढले होते. आता त्याच्या दुखापतीबद्दल रोहितने महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत.

Pranali Kodre

Shreyas Iyer Health Updates: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सोमवारी अहमदाबादला झालेला कसोटी मालिकेतील चौथा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे ही चार सामन्यांची ही कसोटी मालिकात 2-1 अशा फरकाने जिंकली. मात्र, या सामन्यादरम्यान, भारताला श्रेयस अय्यरच्या पाठदुखीने डोके वर काढल्याने मोठा धक्का बसला होता.

हा सामना सुरू असताना तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर श्रेयस अय्यरने पाठीच्या दुखापतीची तक्रार केली होती. त्यामुळे त्याला या सामन्यात फलंदाजी करायला येता आले नाही. त्याने फलंदाजी न केल्याने भारताचा पहिला डाव 9 बाद 571 धावांवर संपला होता.

दरम्यान, हा सामना संपल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने श्रेयसच्या तंदुरुस्तीबद्दल महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत.

रोहित म्हणाला, 'बिचारा, ही खूप दुर्दैवी घटना होती. तो पूर्ण दिवस फलंदाजीसाठी प्रतिक्षा केली आणि दिवसाचा खेळ संपत असताना त्याला पाठदुखीचा त्रास सुरू झाला. त्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आले. त्याच्या स्कॅनच्या रिपोर्ट्सबाबत मला फार काही माहित नाही. पण तो सध्या ठिक वाटत नाहीये.'

'नक्कीच त्याचमुळे तो इथे नव्हता. आता त्याला कितीवेळ या दुखापतीतून सावरायला लागेल आणि तो कधी पुनरागमन करू शकतो आम्हाला सध्या माहित नाही. जेव्हा ही दुखापत झाली, तेव्हा ती वरवरची दिसत नव्हती. मला आशा आहे की तो लवकर बरा होईल आणि परत येऊन चांगला खेळ करेल.

खरंतर श्रेयसने यापूर्वीही पाठदुखीचा सामना केला आहे. याचवर्षी जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत खेळताना त्याला पाठीची दुखापत झाली होती. त्यानंतर तो न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेला मुकला होता. तसेच याच दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही खेळला नव्हता.

पण त्याने दिल्ली झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून भारतीय संघात पुनरागमन केले होते. मात्र पुनरागमनानंतर त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्यात झालेल्या कसोटी मालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत मिळून केवळ 32 धावा केल्या.

भारताबरोबरच केकेआरलाही धक्का बसण्याची शक्यता

दरम्यान, आता श्रेयसला पुन्हा पाठीची दुखापत झाली असल्याने तो 17 मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे.

तसेच आगामी आयपीएल हंगामामध्येही तो खेळू शकेल की नाही, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. श्रेयस कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आहे. त्यामुळे तो जर आयपीएल 2023 हंगामात खेळला नाही, तर त्यांनाही मोठा धक्का बसू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: आजपासून गोव्यात रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Kopardem Accident: कोपार्डे-सत्तरी येथे बस-दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार जखमी

Goa Crime: डिचोलीत साडेतीन महिन्यांत 5 अल्पवयीन मुली अत्याचाराच्या बळी, तीन प्रकरणांत राज्याबाहेरील युवकांचा हात

SCROLL FOR NEXT