IND vs AUS: 'जेव्हा प्राईजमनी शेअर करावी लागते...', अश्विन - जडेजाचा Video तुफान व्हायरल

Ashwin - Jadeja: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील मालिकावीर पुरस्कार अश्विन आणि जडेजा यांना संयुक्तरित्या देण्यात आला. त्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
R Ashwin | Ravindra Jadeja
R Ashwin | Ravindra JadejaDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नुकतीच चार सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत भारताने 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. भारताच्या या विजयात आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांची कामगिरी महत्त्वाची ठरली. त्यामुळे या दोघांनाही संयुक्तरित्या या मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. त्यांनतर सध्या त्यांचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अश्विन - जडेजाची मालिकेत शानदार कामगिरी

या मालिकेत अश्वन सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने 4 सामन्यात 25 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने दोन वेळा डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला. तसेच त्याने 86 धावा केल्या.

तसेच रविंद्र जडेजाने 4 सामन्यांत 22 विकेट्स घेतल्या. त्यानेही दोन वेळा डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला. तसेच फलंदाजी करताना त्याने एका अर्धशतकासह 135 धावा केल्या.

R Ashwin | Ravindra Jadeja
R Ashwin @450: अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा! कॅरीची विकेट घेत रचला इतिहास

अश्विन-जडेजाचा मजेशीर व्हिडिओ

या कसोटी मालिकेतील अहमदाबादला झालेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर अश्विनने जडेजाबरोबरचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये 'नाटू नाटू' हे गाणे बॅकग्राऊंडला वाजत आहे. अश्विने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की 'अँड ऑस्कर गोज टू...'

खंरतर सोमवारी 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अश्विन आणि जडेजा यांचा व्हिडिओ होता.

दरम्यान, हाच व्हिडिओ आर अश्विन आयपीएलमध्ये सध्या भाग असलेल्या राजस्थान रॉयल्स संघानेही शेअर केला आहे. राजस्थाने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की 'जेव्हा तुम्हाला मालिकावीर पुरस्काराची बक्षीस रक्कम वाटून घ्यावी लागते.'

अश्विन आणि जडेजाचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

R Ashwin | Ravindra Jadeja
Jadeja - Manjrekar: मैत्रीची नवी सुरुवात? एकमेकांवर आगपाखड करणाऱ्या दोन क्रिकेटरच्या गळाभेटीनं वेधलं लक्ष

"एकमेकांशिवाय चांगली कामगिरी करू शकलो नसतो"

दरम्यान, मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर अश्विन जडेजाबद्दल बोलताना म्हणाला, 'ही चांगली मालिक होती. मी आणि जडेजा खूप वर्षांपासून खेळत आहोत. पण आम्ही एकमकांशिवाय इतके परिणामकार झालो नसतो. तो मला प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य देतो. याचे श्रेय त्याला जाते. जड्डू नेहमीच सहज असतो. तो फार कशाची चिंता करत नाही. पण काल जेव्हा तो बाद झाला, तेव्हा तो एकटाच एक तास बसून होता, तेव्हा तो खरंच निराश असल्याचे माझ्या लक्षात आले. गेल्या दोन-तीन वर्षात आम्ही खूप चर्चा केली आहे.'

तसेच जडेजा म्हणाला, 'अश्विनबरोबर गोलंदाजी करायला मजा येते, तो सतत माहिती देत असतो, काय क्षेत्ररक्षण पाहिजे, कशी गोलंदाजी केली पाहिजे. मी या मालिकेतील माझ्या फलंदाजीबद्दल खूश नाही. मी अजून फलंदाजीकडे लक्ष देईल. अश्विनकडे चांगले क्रिकेट ब्रेन आहे. तो सर्व संघांना ओळखतो.'

जडेजा आणि अश्विन जवळपास गेल्या 10 वर्षांपासून एकत्र खेळत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com