Ben Stokes Dainik Gomantak
क्रीडा

Birthday Special: तुरुंगात जाऊन आलेल्या 'बॅड बॉय'ने इंग्लंडला बनवले वर्ल्ड चॅम्पियन

दैनिक गोमन्तक

इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) आज 4 जून रोजी त्याचा 30 व्या वयामध्ये पदार्पण करत आहे. न्यूझीलंडमध्ये जन्मलेल्या या स्टार अष्टपैलू खेळाडूने आपली बॅड बॉय इमेज चे गुड बॉय इमेज बनवत इंग्लंडसाठी विश्वचषक जिंकला आणि तो सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू बनला. (New Zealand Bad Boy released from prison makes England world champion)

बेन स्टोक्सचे वादांशी जरा सखोल संबंध आहेत. त्यामुळे त्यांची बॅड बॉय इमेजही चाहत्य़ांमध्ये बनली होती. तो नाईट क्लबमध्ये भांडताना पकडला गेला होता, त्यानंतर त्याला तुरुंगातही डांबन्यात आले होते. 2014 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर आउट झाला, त्यानंतर त्याने ड्रेसिंग रूममध्ये जाऊन लॉकरवर आदळ आपट केली. त्यामुळे बोट फ्रॅक्चर झाले आणि तो पुन्हा खेळू शकला नाही.

2019 साली स्टोक्स हिरो बनून समोर आला. आणि त्याने आपल्या संघाला विश्वविजेते बनवले. संपूर्ण सामन्यात शानदार खेळ दाखवल्यानंतर त्याने अंतिम फेरीत चार विकेट घेतल्या आणि 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

इंग्लंडला स्वबळावर विश्वचषक जिंकता आला.2019 च्या ऍशेस मालिकेतही बेन स्टोक्स तिथून हिरो म्हणून उदयास आला. मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात स्टोक्सच्या नाबाद शतकाच्या (135) बळावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा एका विकेटने पराभव करून इतिहास रचला.

बेन स्टोक्सने 79 कसोटीत 5061 धावा केल्या 174 विकेट घेतल्या. यामध्ये 11 शतके आणि 26 अर्धशतकांचा देखील समावेश आहे. त्याच वेळी, 101 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 2871 धावा केल्या आणि 74 विकेट आपल्या नावावर केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 3 शतके आणि 21 अर्धशतके आहेत, तसेच स्टोक्सने 34 टी-20 सामन्यांमध्ये 19 विकेट घेतल्या असून 442 धावा ठोकल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT