ख्रिस यांना पुन्हा पाठीच्या कण्याचा झटका (Spinal cord injury) आला असल्याचे त्यांचे वकील आरोन लॉयड यांनी एका निवेदनच्या माध्यमातून सांगितले आहे. Dainik Gomantak
क्रीडा

New Zealandचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्सला अर्धांगवायूचा झटका

ख्रिस (Chris Cairns) यांना पुन्हा पाठीच्या कण्याचा झटका (Spinal cord injury) आला असल्याचे त्यांचे वकील आरोन लॉयड यांनी एका निवेदनच्या माध्यमातून सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

न्यूझीलंडमधून (New Zealand) एक वाईट बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्सला (Chris Cairns) शस्त्रक्रियेनंतर आता अर्धांगवायू (Paralysis) झाला आहे. ख्रिस केर्न्स यांच्यावर काही दिवसांपूर्वी हृदयाची शस्त्रक्रियाही (Heart surgery) झाली होती. परंतु त्यातून ते पूर्ण बरे होऊन त्यांना त्यांच्या कॅनबेरा येथील घरी देखील सोडण्यात आले होते. मात्र ख्रिस यांना पुन्हा पाठीच्या कण्याचा झटका (Spinal cord injury) आला असल्याचे त्यांचे वकील आरोन लॉयड यांनी एका निवेदनच्या माध्यमातून सांगितले आहे.

आरोन लॉयड म्हणाले, “हृदय शस्त्रक्रियेदरम्यान ख्रिसला सिडनीमध्ये त्याच्या पाठीच्या कण्यामध्ये स्ट्रोक आल्याने त्यांच्या पाठीला अर्धांगवायूचा झटका आला आहे.

ते पुढे म्हणाले, “आता सध्या त्यांच्यावर ऑस्ट्रेलियातील एका स्पाइनल हॉस्पिटलमध्ये महत्वाची पुनर्वसन प्रक्रिया सुरु आहे. या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी आपल्याकडून त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे ख्रिस आणि त्याचे कुटुंबियांनी आपल्या सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच ज्या प्रकारे त्यांच्या गोपनीयतेचा आदर केला गेला आहे. त्याचेही त्यांनी कौतुकही केले आहे.

“ख्रिस आणि त्याच्या कुटुंबाला आता शक्य असेल तिथे एकत्र वेळ घालवण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्याला बरे होण्यासाठी जे काही शक्य आहे ते आम्ही सर्वजण करतच आहोत. आम्ही तुम्हाला अपडेट देत राहूच. पण त्यासाठी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. "

ख्रिस क्रेन्सच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने न्यूझीलंडसाठी 215 एकदिवसीय आणि 65 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने भारताविरुद्ध एक कसोटी शतक देखील केले आहे. केर्न्सवर यापूर्वी कॅनबेरा येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. पण नंतर त्याला सिडनीला हलवण्यात आले. क्रेन्सवर मॅच फिक्सिंगचा आरोपही होता. यामुळे, त्याची आर्थिक स्थिती खालावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: "बेघर गोवेकरांना शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्याची मागणी" आमदार वीरेश बोरकर

Bangkok Shooting: कंबोडियासोबत युद्ध सुरु असतानाच थायलंडच्या बँकॉकमध्ये गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःलाही संपवलं Watch Video

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी मोठी घोषणा! 13 हजार धावा करणारा दिग्गज बनला मुख्य प्रशिक्षक

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

SCROLL FOR NEXT