न्यूझीलंडचा (New Zealand) माजी क्रिकेट आणि अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्स (Chris Cairns) याची तब्येत अधिकच खालावली आहे. त्याची परिस्थिती चिंताजनक असून त्याला आता व्हेंटिलेटरवर (Life Support) ठेवले असल्याचा समोर येत आहे. तो सध्या ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा रुग्णालयात उपचार घेत आहे.
51 वर्षीय केर्न्स यांना हृदयाच्या समस्येनंतर अनेक शस्त्रक्रिया झाल्या होत्या परंतु त्यांनी अपेक्षेप्रमाणे उपचारांना प्रतिसाद दिला नव्हता आणि त्याची प्रकृती आता चिंताजनक असल्याचे समजत आहे.
असे सांगितले जात आहे की त्याच्या शरीराच्या मुख्य धमन्यांपैकी एकाची आतील पृष्ठभाग फुटला आहे, ज्यामुळे रक्त गळत आहे. आता त्याला लवकरच सिडनीच्या तज्ज्ञ रुग्णालयात हलवण्यात येईल.न्यूझीलंड हेराल्ड वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ख्रिस क्रेन्सची बिघडलेली स्थिती पाहता, लवकरच त्याला सिडनीच्या एका स्पेशल रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते.
जगभरातील लोकांना न्यूझीलंडच्या ख्रिस केर्न्सच्या खालावत चाललेल्या आरोग्याबद्दल कळताच ते त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. 51 वर्षीय क्रेन्स क्रिस क्रेन्स गेल्या काही वर्षांपासून पत्नी मेलेनिया क्रेन्स आणि मुलांसोबत ऑस्ट्रेलियामध्ये राहत आहे. त्याने न्यूझीलंडसाठी 17 वर्षे म्हणजेच 1989 ते 2006 पर्यंत तीनही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले आहे. तो त्याच्या काळात उजव्या हाताचा मध्यम फळीचा फलंदाज आणि उजव्या हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज होता.
त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने 62 कसोटी, 215 एकदिवसीय आणि 2 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. क्रेन्सने कसोटी क्रिकेटमध्ये 3320 धावा आणि 218 विकेट्स घेतल्या आहेत, तर वनडेमध्ये त्याने 4950 धावा करताना 201 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी, 2 सामन्यांच्या टी 20 कारकिर्दीत त्याने केवळ 2 धावा केल्या, तर एक विकेटही त्याच्या नावावर केली.
क्रेन्सचे वडील देखील ब्रँडल लान्स क्रेन्स किवी संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू राहिले आहेत. त्यांनी सुद्धा आपल्या देशासाठी 43 कसोटी आणि 75 (1974 ते 1985) एकदिवसीय सामनेही खेळले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.