न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्सने जिंकली आयुष्याची लढाई

ख्रिस आता बरा आहे. चांगली गोष्ट म्हणजे तो त्याच्या कुटुंबाशी बोलत आहे. सततच्या पाठिंब्यासाठी आणि प्रार्थनांसाठी त्याने आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.
न्यूझीलंडचा (New Zealand) माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्स (All-rounder Chris Cairns) हा फायटर असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
न्यूझीलंडचा (New Zealand) माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्स (All-rounder Chris Cairns) हा फायटर असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

न्यूझीलंडचा (New Zealand) माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्स (All-rounder Chris Cairns) हा फायटर असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. पण यावेळी त्याने त्याच्या आयुष्याची लढाई जिंकली (Won the battle of life) आहे. त्याचा लाईफ सपोर्ट काढून टाकण्यात आले आहे. पण तरीही त्याला सिडनीमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्याच्या कुटुंबाशीही बोलले असता, ते म्हणाले, 51 वर्षीय न्यूझीलंडच्या माजी खेळाडूला हृदयविकाराचा झटका आला.

न्यूझीलंडचा (New Zealand) माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्स (All-rounder Chris Cairns) हा फायटर असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्स व्हेंटिलेटरवर

सोशल मीडियावर याविषयी माहिती देताना केर्न्सचे वकील म्हणाले की, 'आम्हाला खूप आनंद झाला की ख्रिस आता बरा आहे. चांगली गोष्ट म्हणजे तो त्याच्या कुटुंबाशी बोलत आहे. सततच्या पाठिंब्यासाठी आणि प्रार्थनांसाठी त्याने आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच गोपनीयता राखण्यास देखील सांगण्यात आले आहे. आम्ही डॉक्टरांशी बोललो असता ते म्हणाले, त्याची प्रकृती आता खूप चांगली आहे.

क्रिकेट न्यूझीलंडचे प्रमुख डेव्हिड व्हाईट यांनी गेल्या आठवड्यात एका निवेदनात म्हटले होते की, ख्रिस केर्न्सच्या स्थितीबद्दल ऐकून मला खूप काळजी वाटते. त्याची सहानुभूती ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील त्याच्या कुटुंबासोबत आहे. तो आमच्या सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक आहे. आम्हाला आशा आहे की तो पूर्णपणे बरा होईल.

ख्रिस क्रेन्सच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने न्यूझीलंडसाठी 215 एकदिवसीय आणि 65 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने भारताविरुद्ध एक कसोटी शतक देखील झळकाविले आहे. केर्न्स पूर्वी कॅनबेरा येथील रुग्णालयात होते. पण नंतर त्याला सिडनीला हलवण्यात आले आहे. क्रेन्सवर मॅच फिक्सिंगचा आरोपही झाला होता. यामुळे, त्याची आर्थिक स्थिती खालावली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com