Nepal Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023 मध्ये 20 वर्षीय रोहित करणार नेतृत्व, जेलमध्ये जाऊन आलेल्या क्रिकेटरचाही संघात समावेश

Nepal Squad: आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी पाकिस्तान, बांगलादेशनंतर आता नेपाळनेही 17 जणांचा संघ जाहीर केला आहे.

Pranali Kodre

Nepal announced squad for Asia Cup 2023:

आशिया चषक 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. सहा देशांच्या संघात खेळली जाणाऱ्या या स्पर्धेसाठी आता 15 दिवसांचाच कालावधी राहिला आहे. त्यामुळे आता सहभागी देशांचे क्रिकेट बोर्ड आपापले संघ घोषित करत आहेत. नुकतेच सोमवारी नेपाळ संघाची घोषणा करण्यात आली आहे.

आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर सिक्स फेरीत भारत आणि पाकिस्तान संघासह अ गटात असलेल्या नेपाळ संघाचे नेतृत्व 20 वर्षीय रोहित पाउडेलकडे सोपवण्यात आले आहे. नेपाळ क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर पोस्ट करत संघाची घोषणा केली.

या संघात अनुभवी खेळाडू संदीप लामिछानेचाही समावेश करण्यात आला आहे. लामिछानेला गेल्यावर्षी कठमांडूमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानळावर आल्यानंतर लगेचच ताब्यात घेण्यात आले होते.

त्याच्यावर सप्टेंबर 2022 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्याच्या अटकेचे आदेश देण्यात आले होते. पण त्यानंतर तो जामीनावर सुटला.

तसेच नेपाळ क्रिकेटने त्याच्यावरील निलंबन हटवले होते. आता त्याचा आशिया चषकासाठीही संघात समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, नेपाळ आशिया चषकाचा सलामीचाच सामना 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध मुलतानला खेळणार आहे. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी नेपाळ भारतविरुद्ध सामना खेळणार आहे.

नेपाळचा संघ - रोहित पाउडेल (कर्णधार), कुशाल भुर्तेल, आसिफ शेख (यष्टीरक्षक), भीम शारकी, कुशाल माला, आरिफ शेख, दीपेद्र सिंग ऐरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी, प्रतिश जीसी, श्याम धाकल, संदीप जोरा, किशोर महतो आणि अर्जू सौद.

वनडे स्वरुपात होणारा आशिया चषक 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. या स्पर्धेत अ गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघ असून ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे.

या स्पर्धेत सुपर सिक्स फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोर फेरीत प्रवेश करतील. सुपर फोर फेरीत देखील चार संघात साखळी पद्धतीने सामने खेळवले जातील, यातून गुणतालिकेतील अव्वल दोन संघ 17 सप्टेंबर दरम्यान अंतिम सामना कोलंबोला खेळणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ: 'किंग' कोहलीची ऐतिहासिक 'विराट' ओव्हरटेकिंग; मैदानात पाऊल ठेवताच मोडला सौरभ गांगुलीचा मोठा रेकॉर्ड

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

SCROLL FOR NEXT