Rajasthan Royals Dainik Gomantak
क्रीडा

राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, 2 करोड वाला गोलंदाज IPL 2022 मधून बाहेर

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 मध्ये दमदार सुरुवात करणाऱ्या राजस्थान रॉयल्सला एकाच दिवसात दोन धक्के बसले आहेत. मंगळवार 5 मार्च रोजी राजस्थानला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध (Royal Challengers Bangalore) पराभवाचा सामना करावा लागला, हा या मोसमातील राजस्थानचा (Rajasthan Royals) पहिला पराभव होता. आता दुसऱ्याच दिवशी संघाला एका दिग्गज खेळाडूच्या दुखापतीने अडचणीत आणले आहे. राजस्थान रॉयल्सने बुधवारी 6 मार्च रोजी सांगितले की, ''संघातील ऑस्ट्रेलियन गोलंदाज नॅथन कुल्टर-नाईल (Nathan Coulter-Nile) दुखापतग्रस्त झाला आहे, ज्यामुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे कुल्टर नाईल आता मायदेशात परतणार आहे. राजस्थानने अद्याप कुल्टर नाईलच्या बदलीची घोषणा केलेली नाही.'' (Nathan Coulter-Nile dropped out of IPL 2022 due to an injury)

दरम्यान, राजस्थान रॉयल्सने बुधवारी त्यांच्या सोशल मीडिया आकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कुल्टर-नाईल दुखापतीमुळे लीग सोडत आहे. आपली निराशा व्यक्त करताना, त्यांनी कुल्टरला लवकरात लवकर बरे होण्यासाठी आणि येत्या हंगामात पुन्हा संघात सामील होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मात्र, कुल्टर नाईलला कधी आणि कोणत्या प्रकारची दुखापत झाली हे राजस्थानकडून सांगण्यात आलेले नाही.

राजस्थानने त्याला 2 कोटींना विकत घेतले

गेल्या मोसमापर्यंत मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) भाग असलेल्या 34 वर्षीय कुल्टर नाईलला राजस्थान रॉयल्सने यंदाच्या मेगा लिलावात 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले. लिलावाच्या पहिल्या फेरीत त्याला कोणत्याच संघाने खरेदी केले नव्हते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अखेर राजस्थानने त्याला आपल्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले. आयपीएल 2022 मध्ये कुल्टर नाईल राजस्थानचा पहिला सामनाही खेळला होता. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात कुल्टर-नाईलला यश आले नाही आणि 3 षटकांत 48 धावाच त्याला करता आल्या.

इतर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले

राजस्थान लवकरच कुल्टर नाईलच्या जागी आणखी एका परदेशी खेळाडूच्या समावेशाची घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे. या मोसमात दुखापतीमुळे बाहेर पडणारा कुल्टर-नाईल हा दुसरा खेळाडू आहे. याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा युवा खेळाडू लवनीत सिसोदियाही काही दिवसांपूर्वी जखमी झाला होता. बंगळुरुने त्याच्या जागी रजत पाटीदारचा समावेश केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT