IPL 2022 VIDEO: आरसीबीनं विजयानंतर केलं दांडगं सेलिब्रेशन

ड्रेसिंग रूममध्ये विजयानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि माजी कर्णधार विराट कोहली बॉलिवूड गाण्यावर थिरकताना दिसले.
IRCB
IRCB Dainik Gomantak
Published on
Updated on

आयपीएल 2022 च्या 13व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने राजस्थान रॉयल्सवरचा शानदार विजय एका वेगळ्याच सेलिब्रेशन गाण्याने साजरा केला. ड्रेसिंग रूममध्ये विजयानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) बॉलिवूड गाण्यावर थिरकताना दिसले. आरसीबीला त्यांच्या सुरुवातीच्या सामन्यात पंजाब किंग्जकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते, परंतु त्यानंतर संघाने शानदार खेळ दाखवत कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थानवर शानदार विजय मिळवला. (IPL 2022)

IRCB
RCBच्या सर्वात महागड्या गोलंदाजाची चाहत्यांनी उडवली खिल्ली

दरम्यान, राजस्थानवर आरसीबीच्या विजयाचा दिनेश कार्तिक हिरो ठरला. त्याने 23 चेंडूत नाबाद 44 धावांची धडाकेबाज खेळी केली. कार्तिक सध्या शानदार फॉर्ममध्ये असून त्याने आरसीबीसाठी मागील 3 सामन्यांमध्ये नाबाद खेळी खेळली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानने आरसीबीला 170 धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्युत्तरात आरसीबीने 5 चेंडूंपूर्वी 7 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. राजस्थानवरील विजयानंतर आरसीबीने ड्रेसिंग रुममध्ये शानदार सेलिब्रेशन केले. ज्यामध्ये विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, दिनेश कार्तिकबरोबर संघातील नवखे खेळाडूही गाण्यावर थिरकताना दिसले.

IRCB
IPL 2022: टॉसचा बॉस बनूनही व्हावं लागलं पराभूत, बड्या संघाची उडाली दांडी

गाण्यांचे बोल काही असे आहेत- पँट लाल आहेत. -शर्ट निळा आहे. सोनेरी सिंह चमकत आहे. आम्ही आरसीबी आहोत. आम्ही धाडसी खेळत आहोत. आम्ही स्वतः फायनलला जाऊ.(The pants are red. The shirt is blue. The golden lion is shining through. We are RCB. We are playing bold. Go to the final on our own. A finer team you’ll never see, a finer team there’ll never be. Those other teams don’t bother me, From RCB I am proud to be. We are RCB, RCB.)

'पँट लाल शर्ट निळा आहे. सोनेरी सिंह चमकत आहे. आम्ही आरसीबी आहोत. आम्ही धाडसी खेळत आहोत. स्वबळावर फायनलला जाणारा आमचा संघ आहे. एक चांगला संघ, तुम्हाला कधीही दिसणार नाही. बाकीचे संघ मला त्रास देऊ शकत नाहीत, मला आरसीबीकडून असल्याचा अभिमान आहे. आम्ही आरसीबी आहोत. यादरम्यान प्लेसी आणि कोहलीही संघाचा उत्साह वाढवताना दिसले. राजस्थानवर विजय मिळवून आरसीबीने गुणतालिकेत सहाव्या स्थानावर मजल मारली आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com