IPL 2022: टॉसचा बॉस बनूनही व्हावं लागलं पराभूत, बड्या संघाची उडाली दांडी

आयपीएल (IPL 2022) च्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात काही संघांसाठी चांगली झाली आहे. तर काही संघाची सुरुवात पराभवाने झाली आहे.
Chennai Super Kings
Chennai Super KingsDainik Gomantak
Published on
Updated on

आयपीएल (IPL 2022) च्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात काही संघांसाठी चांगली झाली आहे. तर काही संघाची सुरुवात पराभवाने झाली. विशेष म्हणजे लीगमधील सर्वात यशस्वी संघांवर सध्या मात्र संक्रात आली आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) या दोन संघानाही पराभवाचा सामना करावा लागत आहे. आता या पराभवाचं नेमकं कारण काय ते सोप्या शब्दात समजून घेऊया... आयपीएलचा दुसरा आठवडा सुरु होताच फलंदाजी करणाऱ्या संघाला पराभवाचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे शेवटचे चार सामने असे होते की, जिथे पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानाच विजय मिळवता आले. (Mumbai Indians and Chennai Super Kings lost for the first time after winning the toss)

दरम्यान, शेवटचे चार सामने जिंकणाऱ्या संघांनी नाणेफेक गमावली. परंतु नंतर फलंदाजी करुन लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या 'प्रीसेट' विचाराने नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधारांनीही अशीच चूक केली. नाणेफेक जिंकूनही त्यांनी नंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय त्यांच्यासाठी अडचणीत आणणारा ठरला.

Chennai Super Kings
IPL 2022 Points Table Update: लखनऊच्या विजयाने बदलले समीकरण, जाणून घ्या नंबर वन

नंतर फलंदाजी करताना त्रास होतो

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि मुंबई इंडियन्स यांच्यात २ एप्रिल रोजी सामना झाला. नाणेफेक जिंकून मुंबईने राजस्थानला फलंदाजीसाठी पहिल्यांदा पाचारण करुन चूक केली. जोस बटलरच्या शानदार शतकाच्या जोरावर राजस्थानने धावफलकामध्ये 193 धावांची भर घातली. 194 धावांचे लक्ष्य गाठणे मुंबईसाठी कठीण बनले. अखेर मुबंईला 23 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. 2 एप्रिल रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्याची कथाही अशीच होती. पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरात टायटन्सनेही 6 गडी गमावून 171 धावा केल्या. या सामन्यातही दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली परंतु नंतर फलंदाजी करण्याची चूक केली. टायटन्सने 14 धावांनी विजयी संपादित केला.

दरम्यान, 4 तारखेला चेन्नई आणि पंजाब यांच्यातील सामन्यात चेन्नईने पहिल्यांदा नाणेफेक जिंकला. परंतु चेन्नईनेही तीच चूक केली. चेन्नईने पंजाबला पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. पंजाबने 181 धावांचे लक्ष्य चेन्नई समोर ठेवले. परंतु अनुभवी फलंदाजांची खाण असणाऱ्या चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला.

Chennai Super Kings
IPL 2022: या दोन शहरांमध्ये होऊ शकतात प्लेऑफ सामने, पहा कुठे होणार फायनल

दुसऱ्या आठवड्यात हा बदल का आला?

यावेळी आयपीएलचे सामने केवळ चार स्टेडियममध्ये खेळवले जात आहेत. मात्र सततच्या सामन्यांमुळे खेळपट्टीच्या दुरुस्तीचे काम व्यवस्थितरित्या होत नाही. खेळपट्टीची दुरुस्ती होत नसेल, तर खेळपट्टीचा वेग कमी होतो. अशा स्थितीत फलंदाजी करणाऱ्या संघातील खेळाडूंना मोठे फटके मारणे कठीण जात आहे. लीगच्या प्रत्येक संघात मोठे 'हिट' शॉट खेळणारे फलंदाज आहेत. परंतु जेव्हा चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नसेल तर फलंदाज फटका कुठून मारणार?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com