Narinder Batra Dainik Gomantak
क्रीडा

Narinder Batra यांनी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा

Hockey Federation: ज्येष्ठ क्रीडा प्रशासक नरिंदर बत्रा यांनी सोमवारी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (FIH) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

दैनिक गोमन्तक

International Hockey Federation: ज्येष्ठ क्रीडा प्रशासक नरिंदर बत्रा यांनी सोमवारी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (FIH) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याचबरोबर त्यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) सदस्यत्वही सोडले. दिल्ली उच्च न्यायालयाने 25 मे रोजी हॉकी इंडियामधील 'आजीवन सदस्य' पद रद्द केल्यानंतर बत्रा यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे (IOA) अध्यक्षपद सोडावे लागले.

दरम्यान, बत्रा यांनी हॉकी इंडियाचे आजीवन सदस्य म्हणून 2017 मध्ये आयओए निवडणूक (Election) लढवली होती. यामध्ये ते मोठ्या मताधिक्याने जिंकून आले होते. बत्रा यांनी अधिकृतपणे IOA, IOC आणि FIH मधील त्यांच्या पदांचा राजीनामा दिला. "वैयक्तिक कारणांमुळे मी FIH च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे," असे बत्रा यांनी AIH कार्यकारी मंडळाला सांगितले.

तसेच, बत्रा यांचे आयओसी सदस्यत्व त्यांच्या IOA अध्यक्षपदाशी निगडीत होते. बत्रा यांनी मे महिन्यातच सांगितले होते की, आता मला जागतिक हॉकी संस्थेतील कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: बोरी पूल वाहतुकीस दोन दिवस राहणार बंद

'IFFI 2025'त 'ही मॅन' धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहताना आमिर खान भावुक! जुन्या आठवणींना दिला उजाळा

Bicholim: ..आणखी कितीजणांचे 'बळी' जाण्याची वाट पाहणार? व्हाळशीतील अपघात टाळण्यासाठी मागणी; जंक्शन ठरतेय मृत्यूचा सापळा

Valpoi: 'रस्ता, गटार किमान 5 वर्षे टिकावेत'! वाळपईवासीयांचे मत, भूमिगत केबल्सची कायम स्वरुपी व्यवस्थेची मागणी

IFFI 2025: 'पर्रीकरांनी हा महोत्सव गोव्यात आणला ही मोठी भाग्याची गोष्ट', तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष के. अण्णामलाई यांचे गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT