हार्दिक पांड्याने रचला इतिहास, 'डबल धमाका' करणारा एकमेव भारतीय

हार्दिक आणि पंत यांनी फलंदाजीदरम्यान शानदार भागीदारी केली आणि भारताला विजय मिळवून देण्यात यश मिळवले आहे असे म्हणायला हरकत नाही.
Hardik Pandya
Hardik Pandya Dainik Gomantak
Published on
Updated on

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी करताना प्रथम गोलंदाजीसह 4 बळी घेतले आणि नंतर 71 धावांची खेळी खेळून चाहत्यांची मने जिंकली. हार्दिकला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताब देण्यात आला आहे. (Hardik Pandya made history the only Indian to do so)

Hardik Pandya
BCCIचा कोहलीला इशारा! फॉर्ममध्ये परत येण्यासाठी दिला वेळ

हार्दिक (Hardik Pandya) आणि पंत यांनी फलंदाजीदरम्यान शानदार भागीदारी केली आणि भारताला विजय मिळवून देण्यात यश मिळवले आहे असे म्हणायला हरकत नाही. पंतने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आणि तो 125 धावांवर तो नाबाद राहिला. त्याचवेळी हार्दिकने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत भारतीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे.

कसोटी ODI आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकाच सामन्यात 4 बळी आणि 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा हार्दिक एकमेव भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. हार्दिक पांड्याने 18 जुलै 2022 रोजी मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध 24 धावांत 4 बळी घेतले आणि तेथे 71 धावांची खेळी खेळली आहे.

Hardik Pandya
आशिया चषक 2022 श्रीलंकेतून UAE मध्ये हलवण्याची शक्यता

याशिवाय हार्दिकने 2018 च्या नॉटिंगहॅम टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडविरुद्धच्या टेस्टमध्ये असा दुहेरी धमाका केला होता, त्याच टेस्ट मॅचमध्ये त्याने 52 रन्सची नाबाद इनिंग खेळली होती आणि 28 रन्समध्ये 5 विकेट्स देखील घेतल्या होत्या.

याशिवाय, T20 इंटरनॅशनलमध्ये, हार्दिकने 7 जुलै 2022 रोजी खेळल्या गेलेल्या साउथॅम्प्टन T20 सामन्यात इंग्लंड विरुद्ध 51 धावांची इनिंग खेळली होती, तर त्याने 4 ओव्हमध्ये 33 धावा देऊन 4 विकेट्सही घेतल्या होत्या. तसे, तिन्ही फॉरमॅटमध्ये असा डबल धमाका करणारा हार्दिक हा जगातील दुसरा क्रिकेटर ठरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com