Kumar Karthikeya: भारतातील बहुतांश तरुणांना क्रिकेटमध्ये करिअर करण्याची इच्छा असते. लोक इतर खेळांमध्येही रस दाखवतात, पण क्रिकेटच्या क्रेझसमोर इतर खेळांना तितकेसे महत्त्व मिळत नाही. परंतु क्रिकेटपटू होणेही सोपे नाही. अव्वल स्तरावर पोहोचलेले क्रिकेटपटू असोत किंवा तिथे जाण्यासाठी स्पर्धा करणारे युवा क्रिकेटपटू असोत, प्रत्येकाची स्वतःची एक कहाणी असते, जी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते.
दरम्यान, अशीच एक कहाणी आहे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) फिरकीपटू कुमार कार्तिकेयची (Kumar Karthikeya), जो क्रिकेटमध्ये करिअर करण्याच्या प्रवासात आपल्या कुटुंबापासून अशा प्रकारे विभक्त झाला की, त्याला तब्बल 9 वर्षानंतर भेटता आले.
दुसरीकडे, फोटो शेअर करताना कार्तिकेयने लिहिले की, “9 वर्ष 3 महिन्यांनंतर मी माझ्या कुटुंबाला आणि आईला भेटलो. मी माझ्या भावना व्यक्त करु शकत नाही.” यापूर्वी, कार्तिकेय म्हणाला होता की, 'मी आयुष्यात काहीतरी मोठे साध्य केल्यानंतरच घरी परतेन.' मे महिन्यामध्येही त्याने सांगितले की, 'इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL) पूर्ण झाल्यानंतरच मी घरी परतेन.' जिथे त्याने पदार्पण केले होते.
तसेच, कार्तिकेयने 30 एप्रिल रोजी डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल पदार्पण केले. चार सामन्यांमध्ये कुमारने 7.85 च्या इकॉनॉमी रेटने पाच विकेट घेतल्या होत्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.