Rohit Sharma X/MIPaltan
क्रीडा

Rohit Sharma: दहा वर्षे, 6 ट्रॉफी अन् एक मुंबईचा राजा! MI ची माजी कर्णधार रोहितसाठी इमोशनल पोस्ट

Mumbai Indians Captain: हार्दिक पंड्याला नेतृत्वाची जबाबदारी दिल्यानंतर मुंबई इंडियन्सने माजी कर्णधार रोहित शर्मासाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

Pranali Kodre

Mumbai Indians Emotional Post for Rohit Sharma after announced Hardik Pandya as a New Captain:

मुंबई इंडियन्सने शुक्रवारी (15 डिसेंबर) सर्वांना धक्का देणारा निर्णय जाहीर केला. मुंबईने इंडियन्सने आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसणार हे स्पष्ट झाले आहे.

रोहित शर्माने 2013 साली मुंबई इंडियन्सचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी स्विकारली होती. तेव्हापासून त्याने 10 वर्षे या संघाचे यशस्वी नेतृत्व केले. त्याने गेल्या 10 वर्षांत मुंबई इंडियन्सला 5 वेळा कर्णधार म्हणून आयपीएल विजेतेपद, तर एक चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकून दिले.

दरम्यान, आता त्याने दिलेल्या योगदानाबद्दल मुंबई इंडियन्सने रोहितचे आभार मानले आहेत. त्यांनी एक भावूक व्हिडिओही शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये गेल्या 10 वर्षातील रोहितचे खास क्षण शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये रोहितने अनेकदा उंचावलेली आयपीएल ट्रॉफीबरोबरचेही फोटोही दिसत आहेत.

तसेच या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 'प्रिय रो, 2013 साली तू मुंबई इंडियन्सचा कर्णधार झालास. तू आम्हाला विश्वास ठेवायला सांगितला. तू आम्हाला जय-परायजयात हसायला सांगितले. 10 वर्षे आणि 6 ट्रॉफीनंतर, आत्ता आपण इथे आहोत. तू आमने कायमचा कर्णधार आहेस, तुझा वारसा मुंबई इंडियन्सच्या इतिहासात कोरलेला असेल. कर्णधार रो, तुझे आभार.'

मुंबई इंडियन्सने रोहितच्या नेतृत्वाखाली 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 साली आयपीएलचे विजेतेपद जिंकले. तसेच 2013 साली चॅम्पियन्स लीगही मुंबईने त्याच्या नेतृत्वाखाली जिंकली.

रोहितने 163 सामन्यांत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना 91 सामन्यांत विजय मिळवले आणि 68 सामन्यांत पराभव स्विकारले आहेत. तसेच 4 सामने बरोबरीत सुटले आहेत.

हार्दिक पंड्या नवा कर्णधार

हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सकडून बराच काळ खेळण्याचा अनुभव आहे. पण गेली दोन वर्षे तो संघात नव्हता. त्याला मुंबई इंडियन्सने 2022 आयपीएलपूर्वी करार मुक्त केले होते. त्यानंतर हार्दिक गुजरात टायटन्स संघाकडून कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये खेळला.

त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने 2022 आयपीएलचे विजेतेपद जिंकले, तर 2023 साली गुजरात उपविजेते होते. पण, आता आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिकला गुजरात टायटन्सकडून ट्रेड करत संघात घेतले आणि आता त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली.

हार्दिक मुंबईकडून 2015 ते 2021 दरम्यान आयपीएल खेळला आहे. त्याने 2015 साली आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडूनच पदार्पण केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT