Hardik Pandya: गुजरात सोडलेल्या हार्दिक पांड्याला लागली लॉटरी, IPL 2024 साठी मुंबई इंडियन्सचे करणार नेतृत्व

Mumbai Indians: आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.
Hardik Pandya
Hardik PandyaDainik Gomantak
Published on
Updated on

Hardik Pandya Replaces Rohit Sharma As Mumbai Indians Captain: आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. रोहित शर्मा गेल्या 10 वर्षांपासून संघाचे नेतृत्व करत आहे. पण यावेळी फ्रँचायझीने आगामी हंगामापूर्वी मोठी डील करत हार्दिक पांड्याला पुन्हा संघात सामील करुन घेतले. आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सने आज नेतृत्व बदल करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. सर्वात यशस्वी आणि आवडत्या कर्णधारांपैकी एक असलेल्या रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले. त्याची जागी आता आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना हार्दिक पांड्या दिसणार आहे.

हार्दिकने आयपीएलचे विजेतेपद पटकावले

हार्दिक पांड्याने कर्णधार म्हणून आयपीएलचे विजेतेपदही पटकावले आहे. 2022 मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने प्रथमच विजेतेपद पटकावले होते. 2022 च्या लिलावापूर्वी मुंबईने हार्दिकला सोडले होते. पण 2024 च्या लिलावापूर्वी हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. आता संघाने रोहितकडून कर्णधारपद काढून घेतले आणि हार्दिक पांड्याला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले.

Hardik Pandya
ट्रेडिंग विंडोचा Mumbai Indians कडून श्रीगणेशा; लिलावाआधीच LSG चा ऑलराउंडर पलटनच्या ताफ्यात

हार्दिक 2015 ते 2021 पर्यंत मुंबई इंडियन्सचा भाग होता

हार्दिक पांड्याने 2015 मध्ये मुंबई इंडियन्स संघासोबत आयपीएलमध्ये पदार्पण केले होते, त्यानंतर 2021 च्या हंगामापर्यंत या संघाकडून खेळताना त्याने चमकदार कामगिरी करुन टीम इंडियामध्ये आपले स्थान पक्के केले होते. 2022 च्या खेळाडूंच्या लिलावापूर्वी, गुजरात टायटन्सने हार्दिकला त्यांच्या संघाचा भाग बनवले आणि त्याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले. यानंतर हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने आपल्या पहिल्याच हंगामात विजेतेपद पटकावले होते. गेल्या आयपीएल हंगामात गुजरातने अंतिम फेरीही गाठली होती. कर्णधार म्हणून, हार्दिकने आयपीएलच्या मागील 2 हंगामात शानदार कामगिरी केली. त्यामुळे आता सर्वांना आशा आहे की, रोहितप्रमाणेच हार्दिकही मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवण्यात आणि संघाला पुन्हा विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

Hardik Pandya
Mumbai Indians: रांचीच्या विकेटकिपरला मुंबई इंडियन्सने दिली संधी, आता ट्रेनिंगसाठी गाठणार इंग्लंड

11 हंगामात 5 वेळा चॅम्पियन

दरम्यान, 2013 च्या मोसमात रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले होते. संघ कठीण परिस्थितीत होता. अशा परिस्थितीमध्येही रोहितने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये मुंबई इंडियन्स रोहितच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनला. त्याने 11 हंगामांसाठी संघाचे नेतृत्व केले आणि 5 वेळा संघाला चॅम्पियन बनवले. महेंद्रसिंग धोनीनंतर रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने 158 सामन्यात मुंबईचे नेतृत्व केले आणि 87 सामने जिंकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com