Mumbai Indians  Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: मुंबई इंडियन्सने नोंदवला दुसरा विजय, स्मृती मानधनाच्या RCBची उडवली दाणादाण

Mumbai Indians: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स (MI) ने महिला प्रीमियर लीग (WPL) 2023 मध्ये त्यांची विजयी मालिका सुरु ठेवली आहे.

Manish Jadhav

Mumbai Indians Women vs Royal Challengers Bangalore Women, WPL 2023: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स (MI) ने महिला प्रीमियर लीग (WPL) 2023 मध्ये त्यांची विजयी मालिका सुरु ठेवली आहे.

मुंबईने सोमवारी स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (आरसीबी) 9 गडी राखून पराभव केला. आरसीबीने 156 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे मुंबईने केवळ 14.2 षटकांत एक विकेट गमावून पूर्ण केले.

दरम्यान, सलामीवीर हेली मॅथ्यूजने 38 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या. तिने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याचवेळी, नताली स्कायव्हरने 29 चेंडूंत 9 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 55 धावा केल्या. मॅथ्यूज आणि सायव्हर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 114 धावांची शानदार भागीदारी केली.

तसेच, यास्तिका भाटियाच्या (23) रुपाने मुंबईला एकमेव धक्का बसला. 45 धावांवर ती पाचव्या षटकात प्रिती बोसची बळी ठरली. मुंबईचा हा सलग दुसरा तर आरसीबीचा सलग दुसरा पराजय आहे. मुंबईने पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सचा 143 धावांनी पराभव केला. त्याचवेळी, आरसीबीने (RCB) दिल्लीविरुद्धचा पहिला सामना 60 धावांनी गमावला.

त्याचबरोबर, 71 धावांवर आरसीबीच्या 5 विकेट पडल्या, त्यानंतर ऋचा घोष (28) आणि कनिका आहुजा (22) यांनी सहाव्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी केली. कनिका 13व्या आणि ऋचा 14व्या षटकात बाद झाली. श्रेयंका पाटीलने 22 आणि रेणुका सिंगने 2 धावांचे योगदान दिले.

मेगन शुटने 20 धावा करत आरसीबीला 150 च्या पुढे नेले. शेवटची खेळाडू म्हणून शुटे पॅव्हेलियनमध्ये परतली.

त्याचवेळी, प्रीती बोस 1 धाव घेतही नाबाद राहिली. मुंबईकडून (Mumbai) हेली मॅथ्यूजने तीन, सायका इसाक आणि अमेलिया केरने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT