WPL 2023: रोमांचक सामन्यात UP चा गुजरातवर विजय! हॅरिसच्या आक्रमणापुढे गर्थच्या 5 विकेट्स व्यर्थ

UPW vs GG: युपी वॉरियर्सने वूमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्स विरुद्ध विजय मिळवला आहे.
UP Warriorz
UP WarriorzDainik Gomantak
Published on
Updated on

UP Warriorz vs Gujarat Giants: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात रविवारी युपी वॉरियर्सने गुजरात जायंट्सविरुद्ध 3 विकेट्सने विजय मिळवला. ग्रेस हॅरिसने अखेरच्या षटकांमध्ये केलेली फटकेबाजी युपीला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची ठरली.

मात्र, गुजरातकडून किम गर्थने घेतलेल्या 5 विकेट्स व्यर्थ ठरल्या. दरम्यान गुजरातचा हा दुसरा पराभव आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्स विरुद्ध त्यांना 143 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

रविवारी झालेल्या सामन्यात गुजरातने एलिसा हेलीच्या नेतृत्वातील युपीसमोर 170 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग युपीने 19.5 षटकात 7 विकेट्स गमावत 175 धावा करत पूर्ण केला.

UP Warriorz
WPL 2023: शफालीचा पुन्हा दिसला 'लेडी सेहवाग' अवतार! RCB गोलंदाजांविरुद्ध लेनिंगसह हल्लाबोल, पाहा Video

या 170 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना युपीने सुरुवातीला 3 विकेट्स 20 धावांवरच गमावल्या होत्या. पण नंतर दीप्ती शर्मा आणि किरण नवगिरेने 66 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पण या दोघीही एका पाठोपाठच्या षटकांमध्ये बाद झाल्या.

दीप्तीने 11 धावा केल्या, तर किरणनने आक्रमक खेळ करताना 43 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 53 धावांची खेळी केली. यानंतर पुढच्या दोन विकेट्सही युपीने झटपट गमावल्या.

पण नंतर ग्रेस हॅरिसने सोफी एक्लेस्टोनला साथीला घेतले आणि आक्रमक खेळ सुरू केला. तिने ताबडतोड फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली. अखेरच्या षटकात युपीला १९ धावांची गरज असताना देखील हॅरिसने युपीला विजय मिळवून दिला.

हॅरिसने 26 चेंडूत 59 धावांची नाबाद खेळी केली. तिने 7 चौकार आणि 3 षटकार मारले. सोफीने 12 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारासह 22 धावांची नाबाद खेळी केली. या दोघींनी 8 व्या विकेटसाठी 26 चेंडूत नाबाद 70 धावांची खेळी केली आणि युपीला अखेरच्या षटकात विजय मिळवून दिला.

UP Warriorz
'IPL असो किंवा WPL, RCB जैसे थे!', DC विरुद्ध बॉलर्सने 223 धावा दिल्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल

दरम्यान, किम गर्थने गुजरातकडून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या होत्या. तिने यासाठी ३६ धावा खर्च केल्या. तसेच तिच्याव्यतिरिक्त गुजरातकडून ऍनाबेल सदरलँड आणि मानसी जोशीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात जायंट्सकडून हर्लिन देओलने 32 चेंडूत 46 धावांची सर्वोच्च खेळी केली. तसेच सभीनेनी मेघना (24), ऍश्ले गार्डनर (25) आणि दयालन हेमलथा (21*) यांनीही छोटेखानी खेळी केल्या.

त्यामुळे गुजरातने 20 षटकात 6 बाद 169 धावा उभारल्या. युपीकडून दीप्ती शर्मा आणि सोफी एक्लेस्टोनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच अंजली सारवाणी आणि ताहलिया मॅकग्राने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com