Tim David
Tim David Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: नोबॉलवर आऊट? टीम डेव्हिडच्या विकेटनंतर चर्चेला उधाण, पाहा Video

Pranali Kodre

Tim David Wicket: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात एलिमिनेटरचा सामना पार पडला. चेन्नईने एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना लखनऊसमोर 183 धावांचे आव्हान ठेवले होते.

दरम्यान, या सामन्यात मुंबईचा फलंदाज टीम डेव्हिडच्या विकेटची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. झाले असे की सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या टीम डेव्हिडने यश ठाकूर गोलंदाजी करत असलेल्या 17 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू फुलटॉस होता. पण त्यावेळी दीपक हुडाने लाँग-ऑनच्या क्षेत्रात त्याचा झेल घेतला.

मात्र हा चेंडू नो-बॉल होता की नाही, हे तिसऱ्या पंचांनी तपासले. त्याने कंबरच्या जवळ चेंडू गेल्याचे दिसले. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी गोलंदाजाच्या बाजूने निर्णय देताना डेव्हिडला बाद करार दिला.

पण या निर्णयावर डेव्हिड प्रचंड निराश दिसला. त्याने मैदानावरील पंच ब्रुस ऑक्सेनफोर्ड यांच्याकडे जाऊन चर्चाही केली. पण तिसऱ्या पंचांनी त्याला बाद दिलेले असल्याने त्याला 13 धावांवर माघारी परतावे लागले.

दरम्यान, त्याच्या या विकेटनंतर सोशल मीडियावरही चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वीही तिसऱ्या पंचांनी हाईटच्या बाबतीतील दिलेले नो-बॉलचे निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. त्याचीही चाहत्यांनी यावेळी आठवण करून दिली आहे.

दरम्यान, मुंबईकडून रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतरही रोहित 11 धावांवर नवीन-उल-हकच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्यानंतर ईशानही 15 धावांवर बाद झाला.

पण नंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी 66 धावांची भागीदारी केली. त्यामुळे 100 धावांचा टप्पा मुंबईने जवळपास 10 षटकात सहज पार केला. पण ११ व्या षटकात नवीनने मुंबईला दोन मोठे धक्के दिले. त्याने सूर्यकुमारला 33 धावांवर आणि ग्रीनला 41 धावांवर बाद केले.

यानंतर मुंबईच्या धावांना लगाम लागला होता. तरी डेव्हिड आणि तिलक वर्मा यांनीही झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण डेव्हिड 13 धावांवर आणि तिलक 26 धावा करून बाद झाला. अखेरीस इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरलेल्या नेहल वढेराने आक्रमक खेळ केला. त्याने 12 चेंडूच 2 चौकार आणि २ षटकारांसह २३ धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईला 20 षटकात 8 बाद 182 धावा उभारता आल्या.

लखनऊकडून नवीन उल हकने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच यश ठाकूरने 3 विकेट्स घेतल्या, तर मोहसिन खानने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa Today News Live: कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी अखेर खूनाचा गुन्हा नोंद

Stray Dogs In Goa: भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले; किनारे बनले असुरक्षित

Shiroda News: शिरोड्यात खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा

Cape News: सांडपाण्याची डबकी, सोकपिट भरले, झाडेझुडपे वाढली; केपे बाजार दुर्गंधीमय

SCROLL FOR NEXT