Ravindra Jadeja Record: जड्डूचा जलवा! IPL मध्ये 'हा' पराक्रम करणारा पहिलाच 'ऑलराऊंडर'

मंगळवारी गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएल क्वालिफायरचा सामना खेळताना चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू रविंद्र जडेजाने एका स्पेशन विक्रमाला गवसणी घातली आहे.
Ravindra Jadeja
Ravindra JadejaDainik Gomantak

Ravindra Jadeja Record: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने मंगळवारी गुजरात टायटन्स विरुद्ध झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात 15 धावांनी विजय मिळवला. एमए चिदंबरम स्टेडियमवर मिळवलेल्या या विजयासह चेन्नईने अंतिम सामन्यातील स्थानही पक्के केले. या सामन्यात चेन्नईसाठी रविंद्र जडेजानेही शानदार कामगिरी केली.

जडेजाने फलंदाजी करताना 22 धावांची छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. तसेच त्याने गोलंदाजी करताना 4 षटकात केवळ 18 धावा देत दसून शनका आणि डेव्हिड मिलर यांच्या महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने या सामन्यात हार्दिक पंड्याचा एक झेलही घेतला.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja - MS Dhoni: जड्डूचे धोनीबरोबर वाद? दिल्लीविरुद्धच्या मॅचनंतरचा Video आला समोर, ट्वीटचीही चर्चा

दरम्यान, जडेजाने गोलंदाजी करताना आयपीएल कारकिर्दीत 150 विकेट्स पूर्ण करण्याचा टप्पाही पार केला. त्याच्या आता आयपीएलमध्ये 225 सामन्यांमध्ये 151 विकेट्स झाल्या आहेत. त्यामुळे तो आयपीएल कारकिर्दीत 2500 पेक्षा अधिक धावा करणारा आणि 150 पेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. जडेजाने फलंदाजीत आयपीएलमध्ये 2677 धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये 1000 पेक्षा अधिक धावा करणारे आणि 150 हून अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा करणारे आत्तापर्यंत जडेजाव्यतिरिक्त ड्वेन ब्रावो आणि सुनील नारायण हे दोनच खेळाडू आहेत. पण त्यांना अद्याप फलंदाजीत २००० धावांचा टप्पा पार करता आलेला नाही.

आयपीएलमध्ये 1000 धावा करणारे आणि 150 हून अधिक विकेट्स घेणारे अष्टपैलू

  • ड्वेन ब्रावो - 1560 धावा आणि 183 विकेट्स

  • सुनील नारायण - 1046 धावा आणि 163 विकेट्स

  • रविंद्र जडेजा - 2677 धावा आणि 151 विकेट्स

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja: जड्डूचा नवा विक्रम! कपिल देव नंतर 'असा' डबल धमाका करणारा दुसराच भारतीय ऑलराऊंडर

चेन्नईचा अंतिम सामन्यात प्रवेश

दरम्यान मंगळवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने 20 षटकात 7 बाद 172 धावा केल्या होत्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. तसेच डेव्हॉन कॉनवेने 40 धावांची खेळी केली. गुजरातकडून मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्यकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर गुजरातचा संघ 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 20 षटकात 157 धावांवर सर्वबाद झाला. गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक 42 धावा केल्या, तसेच राशीद खानने 30 धावांची खेळी केली. अन्य कोणाला खास काही करता आले नाही.

चेन्नईकडून गोलंदाजीत रविंद्र जडेजा, महिश तिक्षणा, मथिशा पाथिराना आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच तुषार देशपांडेने 1 विकेट घेतली.

चेन्नईने या विजयासह तब्बल 10 व्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com