MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni Fan: 'आय लव्ह यू माही...', वाढदिवसापूर्वीच धोनीसाठी चाहत्याने चक्क रक्तानं लिहिलं पत्र

Pranali Kodre

MS Dhoni Fan from Bhilwara Shahpura Wrote Letter: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची लोकप्रियता केवळ भारतातच नाही, तर जगभरात आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग जगभरातून दिसून येतो. त्याला एकदा भेटण्याची किमान त्याची झलक एकदा पाहाण्यासाठी चाहते विविध गोष्टी करतानाही दिसतात. नुकतीच अशीच एक घटना समोर येत आहे.

राजस्थानमधील भीलवाडा जिल्ह्यातील शाहपुरा शहरात धोनीच्या एका चाहत्याने चक्क रक्ताने त्याला निमंत्रण पत्र पाठवण्याचे समजत आहे. धोनी 7 जुलैला त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्याचनिमित्ताने शाहपुरा शहरातील विजेश कुमार या धोनीच्या चाहत्याने एक स्पर्धा खेळवण्याची घोषणा केली आहे.

न्यूज 18 च्या रिपोर्ट्सनुसार विजेशने 7 जुलैला हॅप्पी बर्थडे वर्ल्डकप नावाने स्पर्धेच्या आयोजनाची घोषणा केली आहे. या स्पर्धेचे निमंत्रण पत्रावर विजेशने त्याचे रक्त काढून धोनीसाठी संदेश लिहिला आहे. त्याने धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याने लिहिले आहे की 'आय लव्ह यू माही, तुला भीलवाडामध्ये आयोजित स्पर्धेत यायचे आहे.'

या स्पर्धेत 12 संघ सहभागी होणार आहेत. तसेच जिंकणाऱ्या संघाला 31 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

रिपोर्ट्सनुसार विजेशने असेही सांगितले आहे की तो धोनीचा लहानपणापासून चाहता असून त्याच्यामुळेच तो क्रिकेटपटू बनला आहे. तसेच त्याने असेही सांगितले की त्याने एक एक रुपये जोडत या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील सहभागासाठी 1 जुलैपर्यंत नोंदणी केली जाऊ शकते. तसेच विजयी संघाला 31 हजार आणि उपविजेत्या संघाला 16 हजार रुपये दिले जाणार आहेत.

धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार

धोनीला भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार समजले जाते. त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप आणि 2013 चॅम्पिटन्स ट्रॉफी अशी तीन आयसीसी विजेतीपदे जिंकली आहेत. तो तीन आयसीसी विजेतीपदे जिंकणारा पहिला आणि एकमेव भारतीय कर्णधार आहे. तसेच भारताचा सर्वात यशस्वी यष्टीरक्षकही आहे.

धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 526 सामने खेळले असून 44.96 च्या सरासरीने 11 शतके आणि 108 अर्धशतकांसह 17266 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने यष्टीरक्षक म्हणून 829 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

SCROLL FOR NEXT