MS Dhoni
MS DhoniDainik Gomantak

MS Dhoni: थाला अन् झिवाची लाडक्या कुत्र्यांबरोबर मस्ती, धोनीचा सर्जरीनंतरचा व्हिडिओ व्हायरल

आयपीएल 2023 विजयानंतर धोनीच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाली असून त्यानंतरचा त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Published on

MS Dhoni Video Viral after surgery: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत येत असतो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली नुकतेच गेल्या महिन्यात चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२३ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. पण त्यानंतर लगेचच धोनीच्या गुडघ्यावर मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान, या शस्त्रक्रियेनंतर आता धोनी रांचीला त्याच्या घरी गेला आहे. तो त्याच्या घरी विश्रांती घेण्याबरोबरच कुटुंबासमवेतही वेळ घालवत आहे.

MS Dhoni
MS Dhoni: 'ओह कॅप्टन, माय कॅप्टन!', CSK ने शेअर केलेल्या 33 सेंकदाच्या 'त्या' व्हिडिओने फॅन्स इमोशनल

एमएस धोनीची पत्नी साक्षीने नुकताच एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये धोनीबरोबर त्यांची 8 वर्षांची मुलगी झिवाही दिसत आहे. ते दोघेही त्यांच्या पाळीव कुत्र्यांबरोबर खेळत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या असून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

धोनीच्या गुडघ्यांवर झालेली शस्त्रक्रिया

एमएस धोनी आयपीएल 2023 च्या संपूर्ण हंगामात डाव्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. त्यामुळे मुंबईतील कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये त्याच्या गुडघ्यावर डॉक्टर दिनशॉ परदीवाला यांनी शस्त्रक्रिया केली. सध्या धोनी या शस्त्रक्रियेतून सावरत आहे.

MS Dhoni
MS Dhoni meet Mohammad Kaif: सर्जरीनंतर धोनीची कैफ फॅमिलीशी 'ग्रेट भेट'! जुन्या मित्राच्या मुलाला 'ती' गोष्ट सांगत केले खूश

धोनी खेळाडू शकतो आयपीएल 2024

दरम्यान, आयपीएल 2023 त्याचा अखेरचा हंगाम आहे का अशा अनेक चर्चा सुरू होत्या. मात्र धोनीने आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यानंतर तो पुढील हंगामातही खेळू शकतो, असे त्याने सांगितले होते.

धोनीने यापूर्वीच 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये खेळणे सुरू ठेवले आहे. धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 250 सामने खेळले असून 38.79 सरासरीने आणि 135.92 स्ट्राईक रेटने 5082 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यष्टीरक्षण करताना 180 विकेट्स (138 झेल आणि 42 यष्टीचीत) घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com