World Cup 1983 मध्ये अपमान झाला अन् क्रिकेटचा पुढचा कुंभमेळा भारतात आयोजित करण्यात आला

वर्ल्डकप 1983 मध्ये असं काय झालं होतं की 1987 मध्ये ही स्पर्धा भारतात खेळवण्यात आली, जाणून घ्या.
1983 World Cup
1983 World CupDainik Gomantak
Published on
Updated on

World Cup 1983: भारतीय क्रिकेट संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 सालचा वर्ल्डकप जिंकलेल्याला आज (25 जून) 40 वर्षे पूर्ण झाले आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये या विजयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यावेळी भारतीय संघ पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियनयन झाला होता.

भारतीय संघाने उपांत्य सामन्यात इंग्लंडला हरवल्यानंतर लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या अंतिम सामन्या बलाढ्य वेस्ट इंडिज संघाला 43 धावांनी पराभूत केले होते. भारताच्या या विश्वविजयाने पुढे अनेक पिढ्यांना प्रेरित केले.

पण, याच वर्ल्डकपनंतर वर्ल्डकप स्पर्धा जगभरात घेण्यास सुरुवात झाली, आता जवळपास 5 खंडात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याला कारण ठरला तो एक अपमान.

1983 World Cup
Champions Trophy 2013: धोनीचा 'तो' सल्ला अन् टीम इंडिया बनली चॅम्पियन, वाचा त्या अविस्मरणीय विजयाची कहाणी

नक्की काय झाले होते?

भारतीय संघाने जेव्हा 1983 सालचा वर्ल्डकप जिंकला, तेव्हा बीसीसीआयचे अध्यक्षपद एनकेपी साळवे यांच्याकडे होते. ते केंद्रीय मंत्रीही होते. मीडियातील अनेक रिपोर्ट्सनुसार त्यांनी 1983 वर्ल्डकपसाठी मेरिलबन क्रिकेट क्लबकडे (एमसीसी) तिकिटांची विनंती केली होती. पण त्यांना इंग्लिश क्रिकेट अधिकाऱ्यांकडून नकार देण्यात आला.

सशुल्क तिकिट देण्यास नकार देण्याबरोबरच अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेल्या अनादरपूर्ण वागणूकीने ते अधिक दुखावले गेले. त्यामुळे ते हा अपमान विसरले नाहीत. त्यांनी वर्ल्डकप स्पर्धा इंग्लंडबाहेर खेळवण्यासाठी आवाज उठवला. त्यांना पाकिस्तान क्रिकेटचे प्रमुख नूर खान यांच्याकडूनही पाठिंबा मिळाला.

साळवे यांनी आधी त्यावेळेच्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी त्यांना पाठिंबा दिला. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधान राजीव गांधीनींही त्यांना वर्ल्डकप भारतात आणण्यासाठी पाठिंबा दिला. यावेळी भारतीय क्रिकेटमधील अधिकारी जगमोहन दालमिया आणि आयएस बिंद्रा यांचीही साथ त्यांना लाभली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक अनिल अंबानींनीही पाठिंबा दिला.

1983 World Cup
World Cup 1983: भारत पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याची कहाणी, 'हा' खेळाडू ठरलेला मॅन ऑफ द मॅच

अखेर वर्ल्डकप स्पर्धा इंग्लंडमधून बाहेर हलवण्यात आली. पहिले तिन्ही वर्ल्डकप इंग्लंडमध्ये खेळवण्यात आले होते. पण चौथी वर्ल्डकप स्पर्धा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आली.

दरम्यान, त्यावेळी प्रायोजकांच्या नावावरून वर्ल्डकपला ओळखले जात होते. पहिस्या तिन्ही वर्ल्डकपला प्रुडेन्शिएलचे प्रायोजकत्व असल्याने त्याच नावाने वर्ल्डकप ओळखला गेला. पण चौथ्या वर्ल्डकपला रिलायन्स इंडस्ट्रीजने प्रायोजकत्व दिल्याने हा वर्ल्डकप रिलायन्स कप म्हणून ओळखला गेला.

हा वर्ल्डकप ऍलेन बॉर्डर यांच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत जिंकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com