Mohammad Shami BCCI
क्रीडा

IND vs NZ: 'संधीची वाट पाहात होतो...' सेमी-फायनलनंतर मोहम्मद शमीने काय दिली प्रतिक्रिया?

Mohammad Shami: वर्ल्डकप 2023 सेमीफायनलमध्ये भारताला न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवून देण्यात मोहम्मद शमीने महत्त्वाचा वाटा उचलला.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand, Semi-Final, Mohammad Shami:

भारतीय क्रिकेट संघाने वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. बुधवारी भारताने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला ७० धावांनी पराभूत केले. भारताच्या या विजयाचा नायक ठरला तो वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी. त्याला या सामन्यातील सामनावीर पुरस्कारही मिळाला.

शमीने या सामन्यात 9.5 षटकात 57 धावा देत 7 विकेटस घेतल्या. त्यामुळे तो भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये एका सामन्यात 7 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. दरम्यान, या सामन्यानंतर शमीने त्याच्या गोलंदाजीबद्दल भाष्य केले. तो म्हणाला, तो बरेच दिवस संधीची वाट पाहात होता.

खरंतर शमीला वर्ल्डकप 2023 मधील पहिल्या चार सामन्यात संधी मिळाली नव्हती. मात्र, त्यानंतर त्याला सर्व सामन्यात खेळवण्यात आले. विशेष म्हणजे त्याने या संधीचे सोने करत केवळ 6 सामन्यांत 23 विकेट्स घेतल्या. या 6 सामन्यांतील 3 सामन्यांत तर त्याने 5 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यानंतर शमी म्हणाला, 'मी माझ्या संधीची वाट पाहात होतो. मी मर्यादीत षटकांचे क्रिकेट खूप खेळलो नव्हतो. आम्ही यॉर्कर्स, धीम्या गतीचे चेंडू अशा अनेक गोष्टींची चर्चा केली होती, त्याचे विचार डोक्यात होते. मी नवीन चेंडूने विकेट घेण्याचा प्रयत्न केला. मी नव्या चेंडूने शक्य तितक्या जास्त विकेट्स घेण्याचा प्रयत्न केला.'

तसेच शमीकडून स्थिरावलेल्या केन विलियम्सनचा झेलही सुटला होता. याबद्दलही त्याने प्रतिक्रिया दिली.

तो म्हणाला, 'मी केनचा झेल सोडला होता, मला वाईट वाटले. मी वेग घेण्याचा प्रयत्न केला ते त्यांचे शॉट्स खेळत होते, त्यामुळे मी माझ्या संधीचा फायदा घेतला. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. तसेच दवाचीही भिती होती. गवत चांगले कापलेले होते. धावफलकावर पुरेशा धावा होत्या. दव पडले असते, तर परिस्थितीत बिघडू शकली असती. धीम्या गतीच्या चेंडूंचा वापर झाला नसता.'

तसेच त्याने चांगल्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, 'मला खूप मस्त वाटतंय. हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. आम्ही 2015 आणि 2019 वर्ल्डकपमध्ये उपांत्य सामन्यात पराभूत झालो होतो. आपल्याला पुन्हा अशी संधी मिळेल की नाही हे माहित नव्हते, त्यामुळे संधीचा फायदा घेतला.'

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 बाद 397 धावा केल्या होत्या, त्यानंतर 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 48.5 षटकात 327 धावांवर सर्वाबाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

SCROLL FOR NEXT