Goa Crime: मडगावात खळबळ! ओल्ड मार्केट सर्कल परिसरात आढळला कुजलेला मृतदेह; ओळख पटवण्याचं पोलिसांसमोर आव्हान

Margao Old Market Dead Body: ओल्ड मार्केट सर्कलच्या जवळ असलेल्या एका निर्जन ठिकाणी स्थानिकांना दुर्गंधी येऊ लागली.
Margao Old Market Dead Body
Margao Old Market Dead BodyDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मडगाव शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. शहरातील प्रसिद्ध ओल्ड मार्केट सर्कल परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु करण्यात आला आहे.

कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, ओल्ड मार्केट (Market) सर्कलच्या जवळ असलेल्या एका निर्जन ठिकाणी स्थानिकांना दुर्गंधी येऊ लागली. संशय बळावल्याने नागरिकांनी शोध घेतला असता, तिथे एका व्यक्तीचा मृतदेह दिसला. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या आणि छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे.

Margao Old Market Dead Body
Goa Crime: 25 लाख घेतले, फ्लॅटही विकला नाही! दाबोळीतील धक्कादायक प्रकार; संशयितांना अटकपूर्व जामीन

घातपाताची शक्यता?

हा मृतदेह किती दिवस तिथे पडून होता, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ही आत्महत्या आहे, नैसर्गिक मृत्यू आहे की घातपात, या दृष्टीने पोलीस सर्व कोनांतून तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. नमुने गोळा केल्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी गोव्याच्या वैद्यकीय महाविद्यालय (GMC) रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Margao Old Market Dead Body
Goa Crime: बाप ओरडला अन् काळजाचा तुकडा कायमचा दुरावला! शाळेत न गेल्यानं वडील ओरडले, 12 वर्षांच्या चिमुरड्यानं गळफास घेत संपवलं जीवन

ओळख पटवण्याचे मोठे आव्हान

सध्या पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान मृताची ओळख पटवण्याचे आहे. गेल्या काही दिवसांत परिसरातून कोणी बेपत्ता झाले आहे का, याची माहिती गोळा केली जात आहे. तसेच आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहे, जेणेकरुन ही व्यक्ती तिथे कशी पोहोचली याचा सुगावा लागू शकेल. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, जर कोणाकडे या मृतदेहाबाबत काही माहिती असेल, तर त्यांनी त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com