

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) हे शिस्तीच्या बाबतीत किती कडक आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरण कडक शब्दांत तंबी देण्यात आली आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यावर हार्दिक आपल्या प्रेयसीला सोबत घेऊन गेला होता, मात्र बोर्डाच्या धोरणानुसार त्याला परवानगी नसल्याने आता त्याला एकट्यानेच भारतात परतावे लागले आहे.
भारतीय संघ टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने कोलंबोमध्ये असताना हार्दिक पांड्या त्याच्या प्रेयसीसोबत तिथे वास्तव्यास होता. केवळ फिरण्यासाठीच नव्हे, तर तो संघाच्या अधिकृत हॉटेलमध्ये आणि प्रवासादरम्यानही तिला सोबत ठेवत होता.
BCCI च्या नियमांनुसार, खेळाडूंना विशिष्ट कालावधीसाठी आणि ठराविक अटींवरच कुटुंबीयांना किंवा जोडीदाराला सोबत ठेवण्याची मुभा असते. हार्दिकने या धोरणाकडे दुर्लक्ष केल्याचे समोर येताच बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
BCCI ने हार्दिक पांड्याला या वर्तनाबद्दल कडक ताकीद दिली आहे. बोर्डाच्या धोरणांचे पालन करणे प्रत्येक खेळाडूसाठी अनिवार्य असल्याचे त्याला स्पष्टपणे बजावण्यात आले. या इशाऱ्याचा परिणाम असा झाला की, आज जेव्हा भारतीय संघ कोलंबोहून भारताकडे रवाना झाला, तेव्हा हार्दिक पांड्या विमानतळावर पूर्णपणे एकटा दिसला. बोर्डाने त्याच्या प्रेयसीला संघासोबत प्रवास करण्याची परवानगी नाकारल्याने, त्याला तिला तिथेच सोडून किंवा वेगळ्या व्यवस्थेने मायदेशी धाडावे लागले.
या घटनेनंतर क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा "BCCI पेक्षा मोठे कोणीही नाही" या चर्चेला उधाण आले आहे. खेळाडू कितीही मोठा स्टार असला किंवा त्याने मैदानावर कितीही मोठी कामगिरी केली असली, तरी मैदानाबाहेरील वर्तणूक आणि बोर्डाचे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत, असा संदेश यातून देण्यात आला आहे. या कारवाईमुळे इतर खेळाडूंनाही शिस्तीचा धडा मिळाला असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.