North Korea: 13 वर्षांची मुलगी होणार जगातील सर्वात क्रूर हुकूमशहा? बहिणीचा पत्ता कट करुन पोरीला बनवणार देशाची मालकीण; किम जोंग उनचा 'मास्टर प्लॅन'

North Korea Next Leader Succession: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याच्या कुटुंबात सध्या सत्तेच्या वर्चस्वावरुन मोठी ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली.
North Korea Next Leader Succession
North Korea Next Leader SuccessionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

North Korea Next Leader Succession: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याच्या कुटुंबात सध्या सत्तेच्या वर्चस्वावरुन मोठी ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली असून संपूर्ण जगाचे लक्ष या 'घराणेबदला'कडे लागले आहे. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थांनी दिलेल्या खळबळजनक माहितीनुसार, किम जोंग उनची 13 वर्षांची मुलगी किम जू ऐ हिला उत्तर कोरियाची पुढील उत्तराधिकारी म्हणून घोषित केले जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र, या निर्णयामुळे किम जोंग उनची अत्यंत शक्तिशाली बहीण किम यो जोंग आणि पुतणी किम जू ऐ यांच्यात भविष्यात सत्तेसाठी मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो.

किम जू ऐ हिचे वय सध्या 13 वर्षे असून, ती 14 वर्षांची होताच किम जोंग उन तिला अधिकृतपणे आपली वारसदार म्हणून जगासमोर आणू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दुसरीकडे, किम जोंग उनची 38 वर्षांची बहीण किम यो जोंग ही सध्या उत्तर कोरियातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानली जाते. तिची राजकारणावर (Politics) आणि लष्करावर असलेली पकड अत्यंत मजबूत आहे. वर्कर्स पार्टीच्या सेंट्रल कमिटीत वरिष्ठ पदावर असलेल्या किम यो जोंगने आजवर आपल्या भावाच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर प्रभाव पाडला आहे. अशा परिस्थितीत, आपल्या भावाच्या मुलीला सत्तेची कमान मिळणे तिला कितपत रुचेल, हा मोठा प्रश्न आहे.

North Korea Next Leader Succession
North Korea: 'युद्धासाठी तयार रहा'; किम जोंग यांचे उत्तर कोरियाच्या लष्कराला आदेश

किम जू ऐ पहिल्यांदा नोव्हेंबर 2022 मध्ये एका लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान सार्वजनिकरीत्या दिसली होती. तेव्हापासून ती सातत्याने लष्करी संचलन, शस्त्र निर्मिती कारखाने आणि महत्त्वाच्या सरकारी दौऱ्यांमध्ये आपल्या वडिलांसोबत दिसत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने चीनची राजधानी बीजिंगचा दौराही केला होता, ज्याकडे तिची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जाते. उत्तर कोरियाच्या पुरुषप्रधान राजकारणात पहिल्यांदाच एखाद्या महिलेकडे देशाची कमान जाण्याचे संकेत मिळत आहेत, मात्र हे संक्रमण सोपे नसेल.

North Korea Next Leader Succession
North Korea Missile Test: उत्तर कोरियाचा अमेरिका, जपानसह दक्षिण कोरियाला 'जोर का झटका'; पुन्हा केली क्षेपणास्त्र चाचणी

दक्षिण कोरियाच्या (South Korea) 'नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिस'ने संकेत दिले आहेत की, या महिन्यात उत्तर कोरियात होणाऱ्या एका मोठ्या राजकीय कार्यक्रमात किम जोंग उन आपल्या देशाचे भावी लक्ष्य आणि वारसदार यांबाबत मोठी घोषणा करु शकतात. जर किम जू ऐ हिला उत्तराधिकारी घोषित केले गेले, तर उत्तर कोरियाच्या सत्तेत 'आत्या विरुद्ध पुतणी' असा अभूतपूर्व संघर्ष पेटू शकतो. किम यो जोंगची लष्करी ताकद आणि किम जू ऐ हिला मिळणारा वडिलांचा पाठिंबा यामुळे उत्तर कोरियाचे भविष्य एका वेगळ्या वळणावर जाण्याची चिन्हे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Vaibhavi IIT success story
India Second Gold Medal At Asian Games
Asian Games 2026 India vs South Korea
UN General Assembly Viral Video Syria Leader Phone
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com