VIDEO: हार्दिक-सूर्याचा 'रुद्रावतार'! कुलदीप यादवला 'त्या' चुकीवरुन भर मैदानात झापलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Suryakumar Yadav & Hardik Pandya Angry on Kuldeep Yadav: क्षेत्ररक्षणादरम्यान झालेल्या चुकांमुळे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले.
Kuldeep Yadav Dropped Catch vs Pakistan
Kuldeep Yadav Dropped Catch vs PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

Kuldeep Yadav Dropped Catch vs Pakistan: टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवत सुपर-8 फेरीसाठी दिमाखात प्रवेश केला. या विजयासह टीम इंडिया वेस्ट इंडीज पाठोपाठ सुपर-8 साठी पात्र ठरणारा दुसरा संघ ठरला. भारताने दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव केवळ 114 धावांत आटोपला. जरी भारताला (India) या सामन्यात मोठा विजय मिळाला असला, तरी क्षेत्ररक्षणादरम्यान झालेल्या चुकांमुळे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले.

या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी सुरु असताना 18व्या षटकात ही घटना घडली. हार्दिक पांड्या गोलंदाजी करत असताना बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या कुलदीप यादवने उस्मान तारिकचा एक अतिशय सोपा झेल सोडला. हा झेल इतका सोपा होता की कुलदीप तो सहज टिपेल अशी सर्वांना खात्री होती, मात्र त्याच्या हातातून चेंडू निसटला.

झेल सुटताच गोलंदाज हार्दिक पांड्याने मैदानातच कुलदीपवर ओरडून आपला राग व्यक्त केला. इतकंच नाही तर सामना संपल्यानंतर जेव्हा भारतीय खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते, तेव्हा कर्णधार सूर्यकुमार यादवही कुलदीपला त्या सुटलेल्या झेलवरुन सर्वांसमोर रागावताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गोलंदाजीच्या बाबतीत बोलायचे झाले तर कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) या सामन्यात अत्यंत किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने 3 षटकांत केवळ 14 धावा देत 1 बळी घेतला. त्याच्यासोबतच तिलक वर्मानेही एक बळी मिळवला, पण क्षेत्ररक्षणात तिलकनेही एक झेल सोडला होता. भारताकडून चार गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, ज्यामुळे पाकिस्तानला 18 षटकांतच गाशा गुंडाळावा लागला. भारताच्या या विजयाचा खरा शिल्पकार ईशान किशन ठरला, ज्याने 40 चेंडूत 77 धावांची विस्फोटक खेळी खेळली. जरी भारताने सामना जिंकला असला तरी मोठ्या स्पर्धांमध्ये अशा छोट्या चुका महागात पडू शकतात, असाच इशारा कर्णधार सूर्याने आपल्या कृतीतून दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com